दिव्यांग व्यक्तींनी 6 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावा
रत्नागिरी, ता. 24 : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींनी 06 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत https://register.mshfdc.co.in यावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी केला आहे. Scheme for Persons with Disabilities


दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे, हे या योजनेचे उद्देश आहेत. Scheme for Persons with Disabilities