मोहिमे यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत, ग्रामस्थ, शाळा, महाविद्यालयांची महत्वाची भूमिका
गुहागर, ता. 04 : तालुक्यात पावसाळा संपताच पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने लोकसहभागातून बंधारे उभरणीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. तालुक्याच्या 330 बंधारे बांधण्याच्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत गुहागर तालुक्यात 211 बंधारे उभारण्यात आलेले आहेत. ही मोहिमे यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत, ग्रामस्थ, शाळा, महाविद्यालये यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. Dams built through public participation
संपूर्ण जिल्ह्याला टंचाईतून मुक्त करण्याच्या या मोहिमेत पंचायत समिती, गुहागर, गुहागर तालुका ग्रामसेवक संघटना, गुहागर व ग्रामस्थ, पांगारी तर्फे वेळंब यांनीही आपला उस्फूर्त सहभाग नोंदवत ग्रामपंचायत पांगरी तर्फे वेळंबच्या कार्यक्षेत्रात दि. 27 डिसेंबर रोजी 2 विजय बंधारे बांधत मोहिमेत आपला खरीचा वाटा नोंदवला. Dams built through public participation
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. प्रमोद केळसकर यांनी बंधाऱ्याच्या कामाचे उद्घाटन करत बांधकामाला सुरवात केली. यावेळी माजी सरपंच विष्णु वीर, वाडी प्रमुख शिवाजी खांबे, पोलिस पाटील स्वप्नील बारगोडे, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी सर्जेराव कांबळे, प्रतिक जाधव, विस्तार अधिकारी पंचायत शरद भांड, ग्रामपंचायत अधिकारी भरत घेवडे, गुहागर तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बाबुराव सूर्यवंशी व संघटनाचे ग्रामपंचायत अधिकारी तसेच गजेंद्र पौनिकर, अरविंद खांबे, सखाराम तांबे, पांडुरंग खांबे, सोनाली खांबे, मनाली गिजे, प्रतिक्षा खांबे, पूर्वा शितप,यशवंत गिजे आदी उपस्थित होते. Dams built through public participation