• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुलजार क्रिकेट क्लबच्या स्पर्धा जाहीर

by Guhagar News
December 29, 2024
in Guhagar
184 2
0
Gulzar Cricket Club Tournament
362
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 29 : शहरातील गुलजार क्रिकेट क्लबच्या वतीने जहुर स्मृती चषक 2024 रत्नागिरी जिल्हा एक ग्रामपंचायत ओवर आर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धा दि. 22 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत वरचापाट मोहल्ला येथे भरविण्यात आल्या आहेत. तरी क्रिकेट संघांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन गुलजार क्रिकेट क्लबने केले आहे. Gulzar Cricket Club Tournament

या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रु. 25 हजार रुपयांच्या बक्षिसासह आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या संघाला रोख रु. 15 हजार रुपयांच्या बक्षिसासह आकर्षक चषक देण्यात येणार आहे. याशिवाय मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांची देखील निवड करुन त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेची प्रवेश फी रु. 1600/- असून चेंडू फी रु. 100/- आहे. Gulzar Cricket Club Tournament

स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या संघांनी स्पर्धेच्या नियम व अटी काळजीपूर्वक वाचणे गरजे आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील, स्पर्धा असोसिएशनच्या नियमानुसार खेळवण्यात येतील, गैरवर्तन करणाऱ्या संघास स्पर्धेतून बाद करण्यात येईल, सामन्यात फेरबदल करण्याचा अधिकार मंडळाकडे राहील, खेळाडू एक ग्रामपंचायत मधील असावेl, सहभागी संघ वेळेत हजर न राहिल्यास पेनल्टी लावण्यात येईल, स्पर्धेमध्ये खेळाडूंना दुखापत झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही, स्पर्धा लॉट्स  पद्धतीने खेळवण्यात येतील. नियम व अटी याची अधिक माहिती आयोजकांकडून घ्यावी. Gulzar Cricket Club Tournament

तरी इच्छुक संघांनी नाव नोंदणी करण्यासाठी व अधिक माहितीसाठी शादाब माहीमकर (7507374849) इफ्तिकार भाटकर (8412051445), वासीम झोंबडकर (7083626995) हमजा भाटकर (7218665561) सहीम सय्यद (8208153092 )या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. असे आवाहन गुलजार क्रिकेट क्लबने केले आहे. Gulzar Cricket Club Tournament

Gulzar Cricket Club Tournament

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiGulzar Cricket Club TournamentLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share145SendTweet91
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.