• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश याने रचला इतिहास

by Guhagar News
December 13, 2024
in Bharat
118 1
16
History made by Indian chess player D Gukesh
232
SHARES
663
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वर्ल्ड चॅम्पियन बनणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला

सिंगापूर, ता. 13 : भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश याने बुद्धिबळातील वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. डी मुकेश हा वर्ल्ड चॅम्पियन बनणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला आहे. विश्वनाथ आनंद नंतर अशी कामगिरी करणारा हा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू आहे. अंतिम सामन्यात गुकेशने चीनचा खेळाडू डिंग लिरेनवर मात केली. विशेष म्हणजे तो 18वा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन देखील आहे. History made by Indian chess player D Gukesh

डी गुकेश याने सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळातील वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात चीनच्या डिंग लिरेनला चेकमेट दिला.  डी गुकेशने 14 डावांनंतर साडे सात आणि साडे सहा अशा फरकाने पराभव केला. डी गुकेश हा केवळ 18 वर्षांचा असून तो जगातील सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. यापूर्वी गॅरी कास्पोरोव्ह याने असा विक्रम केला होता. यापूर्वी 2012 मध्ये भारताचे बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती. अंतिम सामन्यात भारताच्या डी गुकेशने चीनच्या डिंग लिरेनला चेकमेट देऊन ही स्पर्धा जिंकली. यावेळी चीनच्या डिंग लिरेनला चेकमेट दिल्यावर गुकेश भावुक झाला आणि त्याला आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत. History made by Indian chess player D Gukesh

वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या डी गुकेशचा जन्म 29 मे 2006 रोजी चेन्नई येथे एका तेलुगू कुटुंबात झाला. त्याचे पूर्ण नाव डोम्माराजू गुकेश आहे.  त्याचे वडील डॉ. रजनीकांत हे कान-नाक आणि घसा सर्जन आहेत, तर आई पद्मा सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहे. वयाच्या सातव्या वर्षी डी गुकेश तो बुद्धिबळ खेळायला शिकला. डी गुकेशने वयाच्या 12 व्या वर्षी ग्रँडमास्टर विजेतेपद पटकावले आणि बुद्धिबळाच्या इतिहासातील तिसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर ठरला. त्यानंतर त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने रौप्यपदक पटकावलं होतं. गुकेशने याआधी वयाच्या 17 व्या वर्षी FIDE ही मानाची बुद्धिबळ स्पर्धाही जिंकली होती. History made by Indian chess player D Gukesh

विश्वविजेता गुकेशची कामगिरी युवकांसाठी प्रेरणादायी  

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या डी. गुकेशचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. गुकेशची कामगिरी ऐतिहासिक आहे आणि ती युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल,असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, ‘डी. गुकेशने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारताची मान जगात उंचावली आहेच. त्याचबरोबर आपल्या देशाचा बुद्धिबळाच्या क्षेत्रातील दबदबा आणखी वाढला आहे. विश्वनाथन आनंदच्या कामगिरीमुळे देशातील मुलांना बुद्धिबळाची आवड निर्माण झाली. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक बुद्धिबळपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली. आता याच कामगिरीची परंपरा गुकेश समर्थपणे पुढे नेईल’, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. History made by Indian chess player D Gukesh

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHistory made by Indian chess player D GukeshLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share93SendTweet58
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.