गुहागर, ता. 29 : शहरातील गुलजार क्रिकेट क्लबच्या वतीने जहुर स्मृती चषक 2024 रत्नागिरी जिल्हा एक ग्रामपंचायत ओवर आर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धा दि. 22 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत वरचापाट मोहल्ला येथे भरविण्यात आल्या आहेत. तरी क्रिकेट संघांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन गुलजार क्रिकेट क्लबने केले आहे. Gulzar Cricket Club Tournament
या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रु. 25 हजार रुपयांच्या बक्षिसासह आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या संघाला रोख रु. 15 हजार रुपयांच्या बक्षिसासह आकर्षक चषक देण्यात येणार आहे. याशिवाय मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांची देखील निवड करुन त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेची प्रवेश फी रु. 1600/- असून चेंडू फी रु. 100/- आहे. Gulzar Cricket Club Tournament


स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या संघांनी स्पर्धेच्या नियम व अटी काळजीपूर्वक वाचणे गरजे आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील, स्पर्धा असोसिएशनच्या नियमानुसार खेळवण्यात येतील, गैरवर्तन करणाऱ्या संघास स्पर्धेतून बाद करण्यात येईल, सामन्यात फेरबदल करण्याचा अधिकार मंडळाकडे राहील, खेळाडू एक ग्रामपंचायत मधील असावेl, सहभागी संघ वेळेत हजर न राहिल्यास पेनल्टी लावण्यात येईल, स्पर्धेमध्ये खेळाडूंना दुखापत झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही, स्पर्धा लॉट्स पद्धतीने खेळवण्यात येतील. नियम व अटी याची अधिक माहिती आयोजकांकडून घ्यावी. Gulzar Cricket Club Tournament
तरी इच्छुक संघांनी नाव नोंदणी करण्यासाठी व अधिक माहितीसाठी शादाब माहीमकर (7507374849) इफ्तिकार भाटकर (8412051445), वासीम झोंबडकर (7083626995) हमजा भाटकर (7218665561) सहीम सय्यद (8208153092 )या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. असे आवाहन गुलजार क्रिकेट क्लबने केले आहे. Gulzar Cricket Club Tournament

