सुमारे 1250 कॅम्प मार्फत 16 दिवसात 1,36,270 रक्तकुपिका संकलित केल्या
गुहागर, ता. 21 : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीज यांच्यावतीने नेहमीच देशभर अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवीले जातात. त्यातीलच रक्तदान हा एक मोठा उपक्रम संस्थानाच्या वतीने दरवर्षी देशभरात राबविला जातो. यावर्षी सुद्धा दिनांक 4 जानेवारी ते 19 जानेवारी या कालावधीमध्ये संपूर्ण देशभरामध्ये सुमारे 1250 कॅम्प मार्फत महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 1 लाख रक्त कुपीकांचे उद्दिष्ट संस्थानाने डोळ्यासमोर ठेवले होते. विशेष म्हणजे 19 जानेवारी अखेर हे उद्दिष्ट संप्रदायाच्या वतीने पार करून तब्बल 1,36,270 रक्तकुपीका नरेंद्राचार्य महाराज संप्रदायाच्या वतीने संकलित करण्यात आल्या आहेत. World record of Narendracharya Maharaj Sansthan


या शिबिरांतून संकलित झालेल्या सर्व रक्तकुपिका महाराष्ट्रातील ब्लड कँसर ग्रस्त पेशंट, किडनी फेल्युअर पेशंट, थलेसिमिया, शिकलसेस इत्यादी आजाराचे गरजू रुग्णांना मोफत उपलब्ध होण्यासाठी शासनाकडे सुपूर्त करण्यात आल्या आहेत. संप्रदायाच्या या कार्याचा सर्वच स्तरांमधून मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे. World record of Narendracharya Maharaj Sansthan
हे कार्य पार पाडत असताना संस्थानाचे सर्व पदाधिकारी सर्व पीठ प्रमुख, व्यवस्थापक तसेच सर्व जिल्ह्याचे जिल्हा निरीक्षक, जिल्हा अध्यक्ष, सर्व तालुक्यांचे तालुका सेवाध्यक्ष तसेच संप्रदायाचे सर्व युवा भक्तगण यांनी मोठ्या प्रमाणावर अथक मेहनत घेऊन हे उद्दिष्ट पार करण्यात खारीचा वाटा उचलला आहे. World record of Narendracharya Maharaj Sansthan