गुहागर, ता. 11 : शैक्षणिक वर्ष 2024-25 चे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक 16,17,18 डिसेंबर 2024 रोजी आर.पी.पी. विद्यालय पालशेत या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात पालशेत विद्यालयात प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत असलेले देवघर येथील श्री. शिवराज विष्णू झगडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. यावेळी त्यांची नाणीज येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली होती. Shivraj Zagde Selection for State Level for Science Exhibition
त्यानंतर माध्यमिक विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेज नाणिज रत्नागिरी येथे हे विज्ञान प्रदर्शन दि. 8, 9 व 10 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाले. या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सुद्धा शिवराज झगडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे व त्यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन 2025 साठी निवड झाली आहे. हे उज्वल यश संपादन केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून शिवराज झगडे अभिनंदन होत आहे. Shivraj Zagde Selection for State Level for Science Exhibition