• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचा विश्वाविक्रम

by Mayuresh Patnakar
January 21, 2025
in Health
168 2
0
World record of Narendracharya Maharaj Sansthan
330
SHARES
944
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सुमारे 1250 कॅम्प मार्फत 16 दिवसात 1,36,270 रक्तकुपिका संकलित केल्या

गुहागर, ता. 21 : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीज यांच्यावतीने नेहमीच देशभर अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवीले जातात. त्यातीलच रक्तदान हा एक मोठा उपक्रम संस्थानाच्या वतीने दरवर्षी देशभरात राबविला जातो. यावर्षी सुद्धा दिनांक 4 जानेवारी ते 19 जानेवारी या कालावधीमध्ये संपूर्ण देशभरामध्ये सुमारे 1250 कॅम्प मार्फत महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 1 लाख रक्त कुपीकांचे उद्दिष्ट संस्थानाने डोळ्यासमोर ठेवले होते. विशेष म्हणजे 19 जानेवारी अखेर हे उद्दिष्ट संप्रदायाच्या वतीने पार करून तब्बल 1,36,270 रक्तकुपीका नरेंद्राचार्य महाराज संप्रदायाच्या वतीने संकलित करण्यात आल्या आहेत. World record of Narendracharya Maharaj Sansthan

या शिबिरांतून संकलित झालेल्या सर्व रक्तकुपिका महाराष्ट्रातील ब्लड कँसर ग्रस्त पेशंट, किडनी फेल्युअर पेशंट, थलेसिमिया, शिकलसेस इत्यादी आजाराचे गरजू रुग्णांना मोफत उपलब्ध होण्यासाठी शासनाकडे सुपूर्त करण्यात आल्या आहेत. संप्रदायाच्या या कार्याचा सर्वच स्तरांमधून मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे. World record of Narendracharya Maharaj Sansthan

हे कार्य पार पाडत असताना संस्थानाचे सर्व पदाधिकारी सर्व पीठ प्रमुख, व्यवस्थापक तसेच सर्व जिल्ह्याचे जिल्हा निरीक्षक, जिल्हा अध्यक्ष, सर्व तालुक्यांचे तालुका सेवाध्यक्ष तसेच संप्रदायाचे सर्व युवा भक्तगण यांनी मोठ्या प्रमाणावर अथक मेहनत घेऊन हे उद्दिष्ट पार करण्यात खारीचा वाटा उचलला आहे. World record of Narendracharya Maharaj Sansthan

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWorld record of Narendracharya Maharaj Sansthanगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share132SendTweet83
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.