• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे विद्यालयात हिंदी भाषा विश्व दिन साजरा

by Ganesh Dhanawade
January 11, 2025
in Guhagar
114 1
0
World Hindi Language Day in Patpanhale School
224
SHARES
640
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांच्या अध्यक्षेत व मार्गदर्शनात हिंदी भाषा विश्व दिवस कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. World Hindi Language Day in Patpanhale School

यावेळी इयत्ता पाचवी ते नववी मधील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतून मनोगत व हिंदी भाषेचे महत्त्व सांगितले. सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस.चव्हाण, कार्यक्रमाध्यक्ष व मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील तसेच हिंदी विषय अध्यापिका सौ.ए.आर.चव्हाण यांनी हिंदी भाषा विश्व दिवस साजरा करण्याचा हेतू, हिंदी भाषेचे महत्व, हिंदी भाषेची ख्याती आदी मुद्द्यांनुसार मार्गदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमासाठी मान्यवर मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व बहुसंख्य विद्यार्थी यांचे सहकार्य लाभल्याबद्दल हिंदी विषय अध्यापिका सौ.ए.आर.चव्हाण यांनी आभार मानले. World Hindi Language Day in Patpanhale School

हिंदी भाषा विश्व दिवस कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील ,  सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस.चव्हाण, हिंदी विषय अध्यापिका सौ.ए.आर.चव्हाण,  सौ.एस.एस.विचारे-सावंत, श्री. एस.एम.आंबेकर आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांच्या हस्ते श्रीसंत कबीर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षिका सौ.एस.एस.विचारे – सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.समृद्धी सुरेश आंबेकर इयत्ता नववी हिने केले.  World Hindi Language Day in Patpanhale School

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWorld Hindi Language Day in Patpanhale Schoolगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share90SendTweet56
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.