महिला दिनानिमित्त हळदीकुंकू व विविध कार्यक्रमांचे आयोजन
गुहागर, ता. 12 : येथील ज्ञानरश्मि वाचनालयाच्या डॉ.तानाजीराव चोरगे सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आणि हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दुर्गा पर्लच्या सौ.स्नेहा खरे व नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘आनंदीबाई रघुनाथराव’ या पुस्तकाच्या लेखिका सौ. निला विवेक नातू तसेच संचालिका सौ. अरुणा पाटील आणि सौ.ज्योती परचुरे या देखील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सौ.ज्योति परचुरे यांनी भुषविले. Women’s Day at Dnyarashmi Library


मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांचा शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सौ.मनाली बावधनकर यांनी केले. या कार्यक्रमातून महिलांना अभिव्यक्त होण्याची संधी देण्यात आली. यामध्ये अन्वी गुडेकर, दिक्षा गुरव, तन्वी तावडे, अनुराधा दामले, रश्मी भावे, वेदश्री धनावडे, अरणी घाडे, रोहिणी सावरकर, रुपा खातू, विद्या गुरव, मुग्धा गमरे, जान्हवी मायदेव, स्नेहल ओक, नेत्राली ओक, लक्ष्मी देवळेकर, आदिती धनावडे, पारिजात कांबळे, स्नेहा वरंडे, उमा बारटक्के, गार्गी क्षिरसागर या मुली व महिलांनी सहभाग घेतला होता. तसेच प्रश्नमंजुषा कार्यक्रमही घेण्यात आला. त्यामध्ये यशस्वी झालेल्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. Women’s Day at Dnyarashmi Library


ज्ञानरश्मि वाचनालयातर्फे ज्येष्ठ महिला वाचक सौ.अरुणा जवळगीकर आणि उत्कृष्ट बाल वाचक कु.वेदश्री धनावडे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच आपल्या पतीच्या निधनानंतर कष्ट करून संसार व मुलांना सांभाळणाऱ्या श्रीम. वर्षा पालशेतकर, श्रीम.प्रविता कदम, श्रीम. मानसी साळवी आणि श्रीम.रोशनी विखारे यांचाही सन्मान करण्यात आला. उपस्थित सर्व महिलांना छोटीशी भेटवस्तू देऊन हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार वाचनालयाच्या सेक्रेटरी प्रा.सौ. मनाली बावधनकर यांनी केले. Women’s Day at Dnyarashmi Library