अभिजित जोग यांच्या फेसबुकवॉलवरुन साभार
GUHAGAR NEWS संपूर्ण जगावर आपलं वर्चस्व असलं पाहिजे या महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या काही शक्ती आज कार्यरत आहेत. संपूर्ण जग आपल्या आर्थिक वर्चस्वाखाली असलं पाहिजे असं मानणारी अतिश्रीमंत घराणी आणि खासगी बँका यांची ‘डीप स्टेट’ ; जगावर धार्मिक वर्चस्व प्रस्थापित करू पाहणारे चर्च आणि इस्लाम ; जगावर आपलं वैचारिक आणि राजकीय वर्चस्व असलंच पाहिजे या विचाराने झपाटलेले वामपंथी या चारही निरंकुशतावादी शक्ती आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी सतत योजना राबवत असतात. Article by Abhijit Jog
आपली वेगळी ओळख, आत्मसन्मान आणि स्वातंत्र्य जपणाऱ्या राष्ट्रांना ते आपल्या मार्गातील सगळ्यात मोठा अडथळा मानतात. या राष्ट्रांमध्ये अराजक माजवून त्यांचा विध्वंस घडवून आणता यावा यासाठी तेथील संघर्षबिंदू ( fault lines ) अधिक भडकावेत आणि नवे संघर्षबिंदू निर्माण व्हावेत ही त्यांची योजना असते. पाश्चिमात्य जगतात वंश (गोरे वि. काळे), नागरिकत्व (नागरिक वि. स्थलांतरित) असे विविध संघर्ष भडकत रहावेत यासाठी ते प्रयत्नशील असतात. याच शक्तींनी आता भारतावर लक्ष केंद्रित केलं आहे. जातीयवाद हीच भारताची एकमेव ओळख ठरावी, जाती-जातीतला संघर्ष सतत भडकत राहून त्या आगीत देशातली संपूर्ण व्यवस्थाच भस्मसात व्हावी हा खेळ सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या ‘तोडो भारत’ खेळात, वर उल्लेख केलेल्या चारही निरंकुशतावादी शक्ती एकमेकांना पूर्ण सहकार्य करत आहेत. Article by Abhijit Jog
राहुल गांधींनी जातीनिहाय जनगणनेची मागणी अचानक लावून धरली आहे… गावोगावी ते “नाम बताओ ” म्हणजेच ‘जात कोणती ते सांगा’ असं ओरडत फिरत आहेत… पंजाबमध्ये शिखांना भडकविण्याचा अटोकाट प्रयत्न होतो आहे… हे सगळे नेपथ्य ठरवून रचले जात आहे. कुठलाही आगापिछा नसताना अचानक उसळलेलं जरांगेचं आंदोलन हादेखील त्यातलाच प्रकार. अशी अचानक सुरू होणारी आंदोलनं हा जनतेचा उत्स्फूर्त उठाव कधीच नसतो. त्यामागे सुनियोजित आणि घातक असं कारस्थान असतं, ज्यासाठी आवश्यक आर्थिक बळ आणि इतर फौजफाटा पुरवण्यात आलेला असतो. ही आग कमी होऊ नये, उलट अधिकच भडकत रहावी यासाठी “तीन मिनिटात संपवून टाकू” असली आगखाऊ विधानं केली जात आहेत. अशीच विधानं यापुढेही केली जातील. हा समाजासाठी रचलेला सापळा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. यात अडकायचं नसेल तर डोकं शांत ठेवणं आणि जाती-जातीत तेढ निर्माण करणारी विधानं प्रकर्षाने टाळणं अत्यंत महत्वाचं आहे. जरांगेंसारख्या प्याद्यांमागे आपल्या ध्येयपूर्तीसाठी फॅनॅटिक असलेली जगड्व्याळ अशी अति-शक्तिशाली यंत्रणा उभी आहे जी थंड डोक्याने भारताच्या विध्वंसासाठी एकामागून एक खेळी करत आहे. आपण ‘अरेला कारे’ करावं आणि जातीयवादाला अधिक जातीयवादाने उत्तर द्यावं हीच या यंत्रणेची इच्छा आहे. आपण त्याप्रमाणेच वागणं म्हणजे या कारस्थानाला बळ देण्यासारखं आहे. Article by Abhijit Jog
आज गरज आहे ती कुठल्याही चिथावणीला बळी न पडता, गमतीत सुद्था जातिवाचक टिप्पणी प्रकर्षाने टाळण्याची. जरांगेंसारख्यांनी काहीही वक्तव्य केली तरी ते आणि त्यांच्या तोंडून बोलणाऱ्या देशविघातक शक्ती म्हणजे मराठा समाज नव्हे. मराठा समाज हा देशभक्त, जबाबदार आणि समंजस समाज आहे. काही लोक लबाड चालींमुळे भरकटले, तरी तेदेखील लवकरच भानावर येतील. त्यांच्या मागण्यांना प्रतिसाद देऊन सरकारने त्यांना आरक्षणही दिले आहे. यावेळी केलेली चोख तयारी बघता ते न्यायालयातही टिकेल असे दिसते. कोणत्याही गटाच्या रास्त मागण्यांवर संवैधानिक मार्गाने तोडगा काढण्याची मॅच्युरिटी आणि लवचिकता महाराष्ट्रात नक्कीच आहे. या मागण्यांच्या पूर्तीसाठी जातीयवादाच्या विध्वंसक वणव्यात आपल्याकडून तेल तर ओतलं जात नाही ना, याची प्रत्येकानेच काळजी घेणं गरजेचं आहे. Article by Abhijit Jog
‘समंजसपणाची अपेक्षा आमच्याकडूनच का ‘ हा प्रश्न कोणी विचारावा अशी ही वेळ नाही. कारण हा स्थानिक पातळीवरचा किरकोळ विषय नाही तर निरंकुशतावादी जागतिक शक्तींनी भारताविरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे, जे चलाख आणि घातक टूलकिट्सच्या माध्यमातून लढलं जातं आहे. हे जिंकायचं तर प्रत्येक भारतीयाने या चिथावणीला भावनिक प्रतिक्रिया नाही तर विचारपूर्वक योग्य प्रतिसाद दिला पाहिजे. Article by Abhijit Jog