गुहागर, ता. 28 : डॉ.तात्यासाहेब नातु स्मृती प्रतिष्ठान संचालित दुर्गाबाई हरी वैद्य माध्यमिक विद्यालय व भागिर्थिबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज अंजनवेल या कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. Welcome function at Anjanvel Junior College
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.मंगेश गोरिवले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्याच बरोबर कु.संस्कृती बाईत आणि ऋषभ बागवे या विद्यार्थ्यांच्या हस्तेही दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर सरस्वती प्रतिमेला कु.मितेश भालेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व डॉ.तात्यासाहेब नातु यांच्या प्रतिमेला कु. उन्मेशा रोहीलकर या विद्यार्थिनीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. Welcome function at Anjanvel Junior College
यानंतर प्राचार्य श्री. मंगेश गोरिवले यांचे व नवोदित विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी कु.सृष्टी राणे, वेदिका वाणरकर यांनी अकरावी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर प्राचार्य श्री.मंगेश गोरिवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कॉलेज म्हणजे अभ्यास ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. कॉलेज मध्ये वर्षभर राबविले जाणार उपक्रम सांगितले. यावेळी प्रा.शलाका माळी, प्रा. उज्वला आर्डे, प्रा.सोनाली अहिरराव. प्रा.उमेश जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रा.उज्वला आर्डे यांनी व्यक्त केले. Welcome function at Anjanvel Junior College