गुहागर, ता. 27 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर मध्ये दि. २४ जानेवारी २०२५ रोजी “Data Science using Python Programming” या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला. या वेबिनारचे मार्गदर्शन डॉ. क्रांती घाग, सहायक प्राध्यापक डी. जे. संघवी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई यांनी केले. Webinar on Data Science and Python at Velneshwar College


डॉ. घाग यांनी डेटा सायन्सच्या महत्त्वपूर्ण संकल्पनांवर प्रकाश टाकला आणि Python चा वापर करून डेटा विश्लेषण, मशीन लर्निंग आणि डेटा व्हिज्युलायझेशन कशाप्रकारे करू शकतो. यावर सखोल माहिती दिली. त्यांनी विविध व्यावहारिक उदाहरणांसह Python च्या ताकदीवर चर्चा केली, ज्यामुळे सहभागींचा दृष्टिकोन बदलला. या वेबिनारमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी तसेच डेटा सायन्स क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक असलेल्या व्यावसायिकांनी भाग घेतला होता. डॉ. घाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागींनी डेटा सायन्स आणि Python चे महत्त्व समजून घेतले. Webinar on Data Science and Python at Velneshwar College
या वेबिनारचे समन्वयक म्हणून कॉम्प्युटर विभागातील प्रा. कृष्णा मालठाणकर व प्रा. राधिका कदम यांनी काम पाहिले. तसेच महाविद्यालयातील कॉम्प्युटर विभागाचे विभागप्रमुख प्रा. केतन कुंडीया, उपप्राचार्य अविनाश पवार आणि प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा वेबिनार यशस्वी संपन्न झाला. Webinar on Data Science and Python at Velneshwar College