• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बोगस निविदा प्रकरणी ग्रामसेविकेची वेतनवाढ रोखली

by Ganesh Dhanawade
August 20, 2024
in Guhagar
168 1
0
329
SHARES
940
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वेळणेश्वर ग्रामपंचायत कामकाजातील त्रुटींमुळे केली प्रशासकीय कारवाई

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील वेळणेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांनी २९ फेबुवारी रोजी प्रसिद्ध केलेली निविदा नियमबाह्य असल्याचे केलेल्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. या बोगस निविदा प्रसिद्ध केल्याप्रकरणी गुहागर पंचायत समितीने ग्रामसेविका श्रीम. अनिता चन्नाप्पा पाटील यांची एक वेतनवाढ थांबविणेची प्रशासकीय कारवाई केली आहे. Wages hike stopped in bogus tender case

गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर ग्रामपंचायतीच्या बोगस निविदा प्रसिद्धी प्रकरणी वेळणेश्वर येथील सुरेंद्र घाग यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मागिल तारखांना निविदा प्रसिद्ध करण्याचे प्रकरण ग्रामसेवक व तात्कालीन सरपंच यांच्या चांगलेच अंगलट आले होते. यामध्ये सरपंच यांनी राजीनामा दिल्याने याप्रकरणाच्या चौकशीनंतर वेळणेश्वर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीम. अनिता चन्नाप्पा पाटील या एकटयाच या प्रकरणात अडकल्या. Wages hike stopped in bogus tender case

निविदा प्रसिद्ध करताना प्रशासनाची महत्वाची भूमिका असते. यामुळे ग्रामसेविका श्रीम. पाटील अडचणीत आल्या. चौकशीमधून कोणतेही अंदाजपत्रक व तांत्रिक मान्यता न घेता एकदा निविदा प्रसिद्ध केल्याचे पुढे आले होते. ऐवढेच नव्हे तर ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक ज्या २९ फेब्रुवारी २०२४ रोजी एका वृत्तपत्रातून निविदा छापली असे दाखवीले आहे. त्या वृत्तपत्राच्या संपादकाने या तारखेला आपण कोणतीही निविदा प्रसिद्ध केली नसल्याचे पत्र दिले आहे. यामुळे विस्तार अधिकारी यांनी केलेल्या चौकशी अहवालामध्ये नियमबाह्य निविदा असल्याचे म्हटले होते. कारवाई करण्याअगोदर गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेविकेंना खुलासा मागितला होता. अखेर बोगस निविदा प्रसिद्ध केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर यांनी ग्रामसेविका पाटील यांच्यावर एक वेतनवाढ थांबवण्याची प्रशासकीय कारवाई केली आहे. Wages hike stopped in bogus tender case

दरम्यान वृत्तपत्रामध्ये बोगस नोटिस प्रसिद्ध केलेल्या कामांमध्ये काही कामे अगोदरच पूर्ण झाली आहेत. कामे पूर्ण झाल्यानंतर निविदा काढण्याच्या प्रकारावर पंचायत समिती कोणती कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे. Wages hike stopped in bogus tender case

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWages hike stopped in bogus tender caseगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share132SendTweet82
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.