गुहागर, ता. 13 : अर्धांगवायू आजारावर आयुर्वेदिक औषध विकण्यासाठी गुहागर तालुक्यात फिरणाऱ्या संशयिताला गुहागर पोलिसांनी अवघ्या २४ तासातच अटक केली आहे. त्याची गाडीही जप्त करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे अनेकांची फसवणूक टळली आहे. Paralysis medicine sellers arrested
गुहागर तालुक्यात अर्धांगवायू आजारावर औषध विकणारा एक इसम गेले तीन दिवस गाडी घेऊन गाव-वाडीवार फिरत असून काही गावांमध्ये त्याने या औषधावर बरेच पैसे घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अनेकांनी हे औषध खरेदी करुन स्वतःची फसवणुकही केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांना याची खबर मिळाली होती. संबंधित वाहन फिरताना दिसताच गुहागर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी केले होते. पोलिसपाटील, जागृक नागरिक यांना सूचना देण्यात आल्या होत्या. अखेर पोलिसांच्या सूत्राकडूनच माहिती मिळताच संशयित चंद्रकांत पांडुरंग वायकर माळशिरस (जि.सोलापूर) याला गुहागर येथे गाडीसह ताब्यात घेण्यात आले. Paralysis medicine sellers arrested
गाडी क्रमांक mh45ax0203 दरम्यान, या घटनेची फिर्याद संदीप शांताराम हळ्ये (रा. अडूर, भाटलेवाडी) याने पोलिसांना फिर्याद दिली. संशयित वायकर हा आपल्या घरी येऊन त्याने पँरालिसीसचे बरेच रुग्ण बरे केल्याचे सांगून माझ्या वडिलांच्या पँरालिसच्या आजार पूर्णपणे तात्काळ बरे करतो असे खोटी बतावणी करुन त्याच्यावरती विश्वास ठेऊन भाग पाडून त्याच्याकडे औषध विक्रीचा कोणताही परवाना नसताना आपल्याकडील औषध हे अवास्तव किमतीत विकत घेण्यास फिर्यादीला भाग पाडून त्याच्यासह एकूण ३ लोकांची १९ हजार ३०० रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. संशयित आरोपीवर भा.दं. वि. कलम २०२३ चे कलम ३१६ (२)/ ३१९ (२) /३१८ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपीला गाडीसह गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलीस करत आहेत. Paralysis medicine sellers arrested