इन्स्टावर फेक हिंदू आय डी बनवून हिंदू मुलींना फसवण्याचा बेत फसला
गुहागर, ता. 11 : हिंदू मुलाच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाऊंट काढून रत्नागिरीतील १३ वर्षीय मुलाने चंदीगड पंजाब येथील १८ वर्षीय मुलीला फूस लावून रत्नागिरीत लग्नासाठी बोलावून घेतले. या संपूर्ण प्रवासात तिला पैसे पुरवण्यात आले. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर तिला नेण्यासाठी कारचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र त्या तरुणीचे दैव बलवत्तर म्हणून ही युवती फसवणूक होण्यापासून वाचली. Shocking type in Ratnagiri
ज्या हिंदू नावाने फेक आइडी वरून तो मुलगा मुलीच्या संपर्कात होता तो मुस्लिम समाजाचा असल्याचे आणि या मुलाच्याही मागे अन्य कोणी सूत्रे हलवत त्या मुलीला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे. चंदीगडच्या या मुलीला रत्नागिरीतील हिंदू बांधवानी एकत्र येऊन मदत केली. मात्र रत्नागिरी पोलिसांनी याचा सखोल तपास करण्या ऐवजी फेक नावावरच गुन्हा दाखल करून त्या मुलाची चौकशी न करता सोडून दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. Shocking type in Ratnagiri
या घडलेल्या संपूर्ण प्रकारची माहिती चंदीगडमधील त्या मुलीने शनिवारी प्रसार माध्यमांसमोर सांगितली. ती म्हणाली की गेले वर्षभर इंस्टाग्राम वर हर्ष कुमार यादव नावाच्या युवकाशी तिची मैत्री झाली होती. या मैत्रीतूनच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर गेले दोन महिन्यांपासून या युवकांने तिला लग्नाची मागणी घालत तिला रत्नागिरीत बोलावून घेतलं. सुरुवातीला दोन महिन्यांनी लग्न करूया असं सांगणाऱ्या या युवकाने कालांतराने तत्काळ तू चंदीगड येथून मोहाली, लखनऊ आणि लखनऊ येथून रत्नागिरीत ये असं तिला सांगितलं. यासाठी लागणाऱ्या पैशांची व्यवस्था सुद्धा या हर्ष कुमार यादव नावाच्या मुलाकडून तिला होत होती. चंदीगडहून लखनऊला आल्यानंतर या मुलीला तिचे सिम कार्ड फेकून देण्यास सांगितले. त्यानंतर तेथीलच एका व्यक्तीकडून तिला पैसे पाठवण्यात आले. त्या पैशाच्या आधारे ती रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आली. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आल्यावर आपण तात्काळ लग्न करणार आहोत. तुला न्यायला आपल्या दोघांचं नाव असलेली एक कार येईल असंही तिला सांगितलं गेलं. तिच्या सुदैवाने तिची ट्रेन लवकर रत्नागिरी स्थानकामध्ये दाखल झाली. रत्नागिरीत आल्यानंतर तिथे तिला नेण्यासाठी आलेली कोणतीही गाडी दिसली नाही म्हणून तिने सातत्याने हर्ष कुमार यादव नावाच्या मुलाशी संपर्क करण्यास सुरुवात केली. त्यावेळेला तो फोन एका मुलीने उचलला आणि त्याचं नाव हर्ष कुमार नसून रुझान असल्याचे आणि तो तेरा वर्षीय मुलगा असल्याचंही सांगितलं. Shocking type in Ratnagiri
आपण फसवलो गेलो आहोत हे लक्षात आल्या नंतर चंदीगढच्या या युवतीने घरी परत जाण्यासाठी पैशांची जमवाजमव करण्यासाठी काम शोधायचे ठरवले. याच वेळेस ती नजीकच्या एका मोबाईल दुकानात गेली. बोलता बोलता त्या मोबाईल वाल्याच्या मुलीवरच्या संकटाची कल्पना आली आणि त्याने रत्नागिरीतील सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यानंतर या युवतीला पोलीस स्थानकात नेवून तिथे रितसर तक्रार दिल्यानंतर त्या फेक नावाच्या मुलाला बोलावण्यात आले. त्या मुलाने म्हणजे कथित हर्षकुमार यादव उर्फ रुंझान याने पोलीस स्थानकात जी माहिती दिली ती अत्यंत धक्कादायक होती. आपण या मुलीशी मुंबईतील एका मित्रासाठी संपर्कात होतो अस त्यानी सांगितले. आश्चर्य म्हणजे यानंतर पोलिसांनी त्याला जाऊ दिले. Shocking type in Ratnagiri
या मुलीच्या मते इन्स्टा वर ज्याचा फोटो होता तो हा मुलगा नाही. मात्र जो फोनवर सतत संपर्कात होता तोच हा मुलगा असल्याचे तिने सांगितले. मी सातत्याने आग्रह करूनही त्याने व्हिडीओ कॉल केला नाही. असे त्या मुलीने सांगितले. यावर त्या मुलाने दिलेल्या माहिती नुसार फोनवर तो स्वतः बोलत होता आणि इन्स्टंवरील मेसेज त्याचा मुंबईतील मित्र करायचा. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधिताना कठोर शिक्षा करावी तसेच हे रॅकेट आहे का याची सखोल चौकशी करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाने केली आहे. सकल हिंदू समाजाने त्या मुलीच्या वडिलांशी संपर्क साधून त्यांना रत्नागिरीत बोलावून घेतले. आणि त्या मुलीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. Shocking type in Ratnagiri