रत्नागिरी, ता. 26 : समर्थ भारत अभियान (पिंपरी चिंचवड) यांचे तर्फे राज्यस्तरीय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शालेय गटांसाठी खुली राहणार आहे. विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी विविध शाळांच्या मुख्याध्यापकांना नाव नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले आहे. Verses of the mind
स्पर्धेत बालवाडीसाठी १ ते ५ मनाचे श्लोक छोटा व मोठ्या गटासाठी १ ते १० श्लोक, इयत्ता पहिली व दुसरीसाठी १ ते २०, इयत्ता तिसरी व चौथीसाठी १ ते ३५, इयत्ता पाचवी व सहावीसाठी १ ते ५० श्लोक, इयत्ता सातवी व आठवीसाठी १ १ ते ६०, इयत्ता नववी व दहावी साठी १ ते ७० श्लोक तर पालक, शिक्षक, व सर्वांसाठी असलेल्या खुल्या गटाला १ ते ७० मनाचे श्लोक पाठांतरासाठी असणार आहेत. Verses of the mind
प्रत्येक गटातून पाहिले तीन क्रमांक काढले जाणार आहेत तर 2 उत्तेजनार्थ बक्षीस दिली जाणार आहेत. प्रत्येक शाळेत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. प्राथमिक फेरी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. स्पर्धेत दोन परिक्षक प्रत्येकी ५० गुण देणार आहेत. यामध्ये पाठांतरासाठी २०, उच्चारासाठी १५, प्रभावासाठी १०, चालीसाठी ५ अशा गुणांची विभागणी असणार आहे. अधिक माहिती साठी रत्नागिरी विभाग प्रमुख डॉ. निशिगंधा पोंक्षे (९९७५८५४५६५) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Verses of the mind