राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांचे मोडका घर येथील धरण पुलावर दुर्लक्ष
गुहागर, ता. 11 : विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर चक्क भर पावसात डांबरीकरण करण्याचा प्रताप या महामार्गाचे ठेका घेतलेल्या मनीषा कंट्रक्शनने केला आहे. आम्हाला वरिष्ठ पातळीवरून सांगितले आहे असे म्हणत भर पावसात डांबरीकरण करण्यात आले आहे. तर याप्रकरणी पाहणी करून त्यांच्याकडून पुन्हा महामार्गाची दुरुस्ती करण्यात येईल असे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Asphalting in heavy rains
गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर राजकारणाच्या आश्वासनाने गाजलेला मोडका आगर धरणावरील पूल सध्या पावसातल्या डांबरीकरणाने पुन्हा चर्चेत आला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी महामार्गाला तडे गेले आहेत हे गेलेले तडे चार महिन्यापूर्वी बुजवण्यात आले मात्र पुन्हा हे तडे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत तर दुसरीकडे मुख्य रस्त्यापासून असलेले संलग्न मार्गावर गेल्या दोन दिवसापासून दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम करण्यात आले एवढेच नव्हे तर शनिवारी एकीकडे सकाळपासून कोसळणारा पाऊस तर दुसरीकडे मनीषा कंट्रक्शन ला ह्या भर पावसात डांबरीकरण करण्याचा नवीन प्रताप करून दाखवला आहे. मोडका घर पुलावर हे डांबरीकरण करण्यात आले असून काही ठिकाणी खराब काम व पडलेल्या तडा मिटवण्यासाठी हा डांबरीकरणाचा नवा फंडा सुरू केला आहे राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता श्याम खुणेकर यांच्याजवळ अधिक माहिती घेतली असता सदर महामार्गाची डागडुजी करण्याचे काम मनीषा कंट्रक्शन चे आहे मात्र त्यांना भर पावसातून डांबरीकरण करावयास सांगितलेले नव्हते, अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता श्याम खुणेकर यांनी सांगितले त्यामुळे जर ते काम खराब असेल तर पुन्हा ते काम करून घेतले जाईल असे स्पष्ट केले. Asphalting in heavy rains
मे महिन्यामध्ये व जूनच्या सुरुवातीला तीव्र स्वरूपाचा उन्हाळा होता अशावेळी ही डागडुजी व डांबरीकरण घेतले गेले नाही मात्र मनीषा कंट्रक्शन पावसातील डांबरीकरणाचा नवीन शोध लावला आहे. दरम्यान या पावसामुळे केलेले डांबरीकरण इतरत्र होणार आहे यामुळे दुचाकी अपघात होण्याची शक्यता आहे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या दर्जा राखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे मात्र ही यंत्रणा या महामार्गाच्या कामांमध्ये कोठेच दिसून येत नाही परिणामी सर्वकाही अलबेला असंच चित्र पहावयास मिळत आहे. Asphalting in heavy rains