गुहागर, ता. 25 : तालुक्यातील वरवेली येथील राजहंस क्रिकेट संघ, रांजाणेवाडी यांच्या विद्यमानाने रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी रांजाणेवाडी प्रिमियर लिग २०२५ पर्व ३ रे या एकदिवसीय स्पर्धेचे आयोजन घास कोपरी, सत्यनारायण कोपरी मैदानाच्या शेजारी, विरार पूर्व येथील भव्य मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ८ वाजता वाडीतील वरिष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. Varveli Rajahans team cricket tournament


या स्पर्धेत एकूण ६ संघ आणि ८६ खेळाडू सहभाग घेणार आहेत. वाडीतील सर्व बांधवांचा एकोपा, संघटन, वैचारिक देवाण-घेवाण, या साऱ्या गोष्टी भविष्यात टिकून राहाव्यात व विविध क्षेत्रात विद्यार्थी तसेच खेळाडू पुढे प्रगती करत राहावे, यासाठीचा हा प्रामाणिक हेतू आहे. तरी या एकदिवसीय क्रिकेट महासंग्रामाचा व रोमांचक सामन्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजहंस क्रिकेट संघ, रांजाणेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे. Varveli Rajahans team cricket tournament

