गुहागर, ता. 14 : राष्ट्र सेविका समिती शाखा गुहागर आणि गुहागर नगरपंचायत तर्फे दरवर्षी प्रमाणे दि. ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ११ ऑगस्ट रोजी महाविद्यालयीन तरुणींसाठी देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा आणि महिलांसाठी स्वातंत्र्य लढ्यातील सहभागी स्त्रिया वेशभूषा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेचे परिक्षण श्री विजय तांबे सौ रश्मी आडेकर तसेच सौ.आदिती धनावडे यांनी केले. Various competitions by Rashtra Sevika Samiti
या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंडचे अध्यक्ष श्री शार्दुल भावे, नगरपंचायतीचे श्री जनार्दन साटले, आंबवकर मॅडम, घाडगे मॅडम तसेच कॉन्स्टेबल पवार मॅडम उपस्थित होते. या स्पर्धेतील वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक – रोहिणी सावरकर, द्वितीय क्रमांक -मीरा गाडगीळ, तृतीय क्रमांक – आरती जाधव. समूहगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक – ज्यूनिअर कॉलेज पालशेत, द्वितीय क्रमांक – श्री देव गोपाळकृष्ण ज्युनिअर कॉलेज गुहागर, तृतीय क्रमांक – रिगल कॉलेज शृंगारतळी, उत्तेजनार्थ – वेळणेश्वर इंजिनिअर कॉलेज स्पर्धेत उत्साहाने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. Various competitions by Rashtra Sevika Samiti