गुहागर, ता. 13 : गुहागर तालुका भंडारी समाज याच्यावतीने बँकिंग उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांना लोकनेते स्व. सदानंद गोविंद आरेकर यांच्या स्मरणार्थ प्रथमच देण्यात आलेल्या गुहागर तालुका भंडारी भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल श्री. आरेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होतं आहे. Bhandari Bhushan Award to Prabhakar Arekar
गुहागर तालुका भंडारी समाज यांच्यावतीने किर्तनवाडी येथील भंडारी भवन येथे विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात श्री. आरेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी समाजाचे अध्यक्ष नवनीत ठाकूर, झी 24 तास प्रतिनिधी प्रणव पोळेकर, मानसी शेटे, सचिव निलेश मोरे, भंडारी समाज युवक अध्यक्ष साहिल आरेकर, मनोज पाटील, खजिनदार तुषार सुर्वे, स्मिता आरेकर, पराग आरेकर, खोत मोहन बागकर, पद्माकर भोसले, न्याती अध्यक्ष अमोल वराडकर, ऍड. अमृता मोरे आदिसह उपस्थित होते. Bhandari Bhushan Award to Prabhakar Arekar
रत्नागिरी जिल्ह्यात पारदर्शक आणि विश्वासार्हता जपणारी पतसंस्था म्हणून श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण या संस्थेचे नाव घेतले जाते. या संस्थेची स्थापना १३ जून २००२ रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रभाकर वि. आरेकर यांनी केली. पाच जिल्हयांसह संपूर्ण कोकण विभाग कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेने विश्वासार्ह पतसंस्था म्हणून संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये नावारूपास आली आहे. संस्थेला प्रगतीपथावर नेण्याचे काम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रभाकर आरेकर यांनी आपले सहकारी संचालक यांचे सहकार्याने केले आहे. सुरक्षितता, विश्वासार्हता, पारदर्शकता व व्यावसायिकता या प्रमुख तत्वांवर संस्थेचे कामकाज सुरू असून त्यामुळे सभासद व ठेवीदार यांचा विश्वास संपादन करण्यात संस्था यशस्वी ठरली आहे. समाजातील व्यक्तीने संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळवल्याने श्री. आरेकर यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. Bhandari Bhushan Award to Prabhakar Arekar