कन्हैया क्रीडा मंडळ गुहागरतर्फे दि. 12 ते 15 जानेवारी कालावधीत
गुहागर, ता. 11 : शहरातील कन्हैया क्रीडा मंडळ गुहागर खालचापाट यांच्या वतीने दिनांक 12 ते 15 जानेवारी या कालावधीत नरेंद्र(नरू दादा) स्मृति व कै.नरेश (नऱ्या भाऊ) स्मृती श्रद्धांजली चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या मागील बाजूस होणार आहेत. Tribute Cup Cricket Tournament at Khalchapat


या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 25 हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकास 15 हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज चषक व बॅट, उत्कृष्ट गोलंदाज चषक व शूज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक व गॉगल तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू याला चषक, बॅट, कॅप, ट्रॅक सूट शूज देण्यात येणार आहे. तर अंतिम सामन्यातील सामनावीर चषक व स्मार्ट वॉच देण्यात येणार आहे. या स्पर्धेची प्रवेश फी दोन हजार रुपये अशी ठेवण्यात आली आहेत. Tribute Cup Cricket Tournament at Khalchapat
तरी इच्छुक संघानी सिद्धार्थ वराडकर ९४२१२३०४००, आर्यन वराडकर ८७६७४५०६४०, सुशांत आरेकर ९१६७५३७२३७, स्वरूप वराडकर ९१४६४३८८९१, सर्वेश वराडकर ८४८४००५५९२, तेजस वराडकर ९९२३९१८६१६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कन्हैया क्रीडा मंडळतर्फे करण्यात आले आहे. Tribute Cup Cricket Tournament at Khalchapat