गुहागर, ता. 10 : गुहागर तालुका वीरशैव लिंगायत (गुरव) ज्ञातीचे विद्यमाने बांधणेत आलेल्या “महात्मा बसवेश्वर भवन” या भव्य वास्तुचा उद्घाटन सोहळा सोमवार दि. ८/१/२०२४ रोजी विविध कार्यक्रमांनी मोठ्या थाटात संपन्न झाला. Inauguration of “Basaveshwar Bhavan” at Waghambe


गुहागर तालुक्यातील वाघांबे (वाघांबे हायस्कूल शेजारी) ठिकाणी हे भवन उभारण्यात आले आहे. या भवनाच्या उदघाट्न सोहळ्यानिमित्त सकाळी लिंगायत-गुरव समाज बांधव व भगिनींच्या उपस्थितीत वास्तूप्रवेश व गणेश पूजन, वास्तुशांती, हवन, त्यानंतर महात्मा बसवेश्वरांच्या मूर्तीची स्थापना, दुपारी १ वाजता वरद शंकराची पूजा असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. Inauguration of “Basaveshwar Bhavan” at Waghambe


सायं. ३ ते ६ वा. निमंत्रीतांचे स्वागत सन्मान, कृतज्ञता सोहळा, दिनदर्शिका प्रकाशन, निमंत्रीतांचे मनोगत आभार तर रात्रौ १०.०० वा. वीरशैव संगित रजनी प्रस्तुत-“अभंग व नाट्यरंग” (सादरकर्ते- संगित रजनीचे सर्व कलाकार) हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित समाज बांधवांनी टाळ्यांची दाद देत समाजातील तरुण कलाकारांचे कौतुक केले. दिवसभरात या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून लिंगायत ज्ञातीबांधवानी भेट देत महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन केले. यावेळी गुहागर तालुका वीरशैव लिंगायत-गुरव समाज संघटनेच्या वतीने मान्यवरांचे शाल-श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. Inauguration of “Basaveshwar Bhavan” at Waghambe

