खड्डेमुक्त झाल्याने बसचालकांमधून समाधान
गुहागर, ता. 28 : गुहागर बसस्थानकाच्या प्रथमच काँक्रीट प्लँटफाँर्मचे काम सुरु झाल्याने त्याचा कायापालट झालेला दिसून येत आहे. विस्तारीत सुसज्ज अशा कामाचा दर्जाही चांगला राखण्यात आला असून संपूर्ण बसस्थानक परिसरच खड्डेमुक्त झाल्याचे समाधान बसचालकांच्या चेहऱ्यावरुन दिसून येत आहे. Transformation of Guhagar Bus Stand
![Review of Guhagar Panchayat Samiti work](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/06/add-2-300x202.jpg)
![Review of Guhagar Panchayat Samiti work](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/06/add-2-300x202.jpg)
गुहागर बसस्थानकात बस लावण्यासाठी मोठा प्लँटफाँर्म आहे. मात्र, तो सुशोभीत नसल्याने तो दिसण्यात येत नव्हता. दरवर्षी बसस्थानकात खड्डे पडलेले. खडबडीतपणा असल्याने बसचालकांनाही बस लावताना मोठी कसरत करावी लागत असे. खड्ड्यात बस आपटणे, पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून ते बस लावत असताना प्रवाशांच्या अंगावर उडणे असे प्रकार घडत असतं. त्यामुळे बसस्थानकात एकप्रकारे बकालपणा दिसून यायचा.
एमआयडीसीच्या माध्यमातून गुहागर बसस्थानकातील प्लँटफाँर्मच्या नव्या काँक्रीटीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे. हे काम काही दिवसांपूर्वी बुल्ड एक्सपर्ट कन्ट्रक्शन या नामांकीत कंपनीकडून सुरु झाले आहे. चिपळूण शिवाजीनगर बसस्थानकाचे काम वेळेत पूर्ण करून गुहागर बसस्थानकाचे काम प्रगतपथावर असून लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास कंपनीच्या ठेकेदारांनी व्यक्त केला. Transformation of Guhagar Bus Stand
या शुभारंभाला कंपनीमार्फत आशिष मोहरेकर, प्रथमेश रहाटे, तेजस शिंदे, ऋतुराज रहाटे उपस्थित होते. प्रथमच अशा पध्दतीचे दर्जेदार काम सुरु असल्याने प्लँटफाँर्मला बस लावणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच प्लँटफाँर्मचा परिसरही मोठा व सुंदर दिसून येत आहे. Transformation of Guhagar Bus Stand