गुहागर, ता. 01 : गुहागर पंचायत समिती, प्रकृति फाऊंडेशन आणि रोटरी क्लब चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील आशा वर्कर्स यांच्यासाठी “आरोग्यदक्ष ग्राम “ या उपक्रमांतर्गत विविध आजार प्राथमिक तपासणीसाठी तज्ञ डॉक्टर्स चे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. गटविकास अधिकारी श्री. प्रमोद केळस्कर यांच्या सकारात्मक सहकार्याने साकारलेल्य या उपक्रमाची सुरुवात दि. २७ डिसेंबर २०२४ रोजी झाली. हा उपक्रम घेण्यामागची भूमिका सुरुवातीला सौ. मिलन जंगम – गुरव ( पुणे) यांनी मांडली तर रोटरी क्लब चे अध्यक्ष प्रा. अविनाश पालशेतकर यांनी वर्षभरात आरोग्यदक्ष ग्राम या उपक्रमासाठी पुढाकार घेऊन विविध कॅम्प आयोजित करण्यात येतील तसेच जी जी मदत लागेल ती मदत रोटरी क्लब च्या माध्यमातून देण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. तर डॉ. राजेंद्र कवठेकर यांनी मोफत डेंटल चेकअप कॅम्प ची माहिती दिली. Training to Asha Workers at Chiplun


आरोग्यदक्ष ग्राम उपक्रम वर्षभर चालणार असून या उपक्रमामध्ये एक दिवसीय प्रशिक्षणात असाध्य आजारामध्ये कॅन्सर या आजाराची प्राथमिक तपासणी आणि लक्षणे याविषयी सविस्तर मार्गदर्शन लाइफ केअर च्या तज्ञ डॉक्टरांकडून देण्यात आले. त्याचबरोबर स्त्री रोग तज्ञ डॉ. राकेश हसबे यांच्याकडून महिलांचे आजार, लक्षणे आणि उपचार, पी सी ओ डी चे मुलींमध्ये वाढलेले प्रमाण आणि जागरूकता याविषयी माहिती देण्यात आली. आयुर्वेदाचार्य मडके यांनी घरगुती उपचार आणि आरोग्य याविषयी सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर आशा वर्कर्स याना ज्या अडचणीना तोंड द्यावे लागते ते म्हणजे पेशंट ला त्वरित मदत न मिळणे याविषयी जनसंपर्क प्रमुख लाईफ केअर श्री. सूर्वे यांनी विविध योजनांची माहिती दिली. मानसिक आरोग्यविषयक मार्गदर्शन निवृत्त जिल्हाधिकारी श्री. पालशेतकर यांनी केले. सर्वात शेवटी प्रशिक्षणार्थीना प्रकृति फाउंडेशन कडून गिफ्ट देण्यात आली. Training to Asha Workers at Chiplun


या उपक्रमासाठी प्रसाद सागवेकर आणि प्रकृति फाउंडेशन च्या देवेंद्र जंगम यांनी पुढाकार घेऊन तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ जांगीड आणि सौ. पवार मॅडम यांच्या सहकार्याने या उपक्रमाची यशस्वीरित्या सुरुवात झाली. या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी जाधव साहेब, पवार मॅडम तसेच रोटरीचे अध्यक्ष प्रा. अविनाश पालशेतकर, पराग बेंद्रे, राजेंद्र कवठेकर तर प्रकृति फाउंडेशन चे अध्यक्ष देवेंद्र जंगम, मिलन जंगम हे उपस्थित होते. तालुक्यातील जवळपास १२० आशा वर्कर्स ना हे प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमाची अत्यंत गरज होती असे आशा ताईनी सांगितले. हा संपूर्ण उपक्रम वर्षभर गरजू लोकांसाठी राबवण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा मिळणार आहे. Training to Asha Workers at Chiplun

