महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला मदतीसाठी पुढाकार
गुहागर, ता. 25 : तालुक्यात सतत पडत असणाऱ्या पावसाने वित्तहानी होत आहे. पांगारी तर्फे वेळंब येथील सुवर्णा शांताराम खांबे यांच्या राहत्या घराचे पूर्णतः नुकसान झाले असून सुवर्णा यांच्या पायाला दुखापत झाली आहे. तर घराचे नुकसान १ लाख रुपये झाले आहे. नुकसान झालेल्या या घराची शनिवारी मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, विभाग अध्यक्ष नितीन कारकर यांनी पाहणी करून सदर वृद्ध महिलेची विचारपूस केली. Total damage to the house in the storm
या घरामध्ये सदर महिला एकटीच राहत होती. मध्यरात्री अचानक कोसळलेल्या घराच्या भिंतीचे दगड अंगावर पडून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. यावेळी मनसे गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी सांगितले की, नुकसानग्रस्त घरातील या वृद्ध महिलेला तातडीने रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचे होते. परंतु प्रशासनाकडून हे झाले नाही. फक्त डॉक्टरांना पाठवून प्राथमिक उपचार करण्यात आले. या संदर्भात तहसीलदार यांच्याशी माझं बोलणं झालं असून तहसीलदार साहेब या संदर्भात येथील तलाठी व ग्रामसेवक यांना या वृद्ध महिलेची भेट घेऊन तातडीने पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देणार आहेत, असे सांगितले. या वृद्ध महिलेला मनसेकडून प्राथमिक आर्थिक मदत करण्यात आली आहे. यापुढे या वृद्ध महिलेसाठी शासनाकडून मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळण्यासाठी मनसे प्रयत्नशील राहील असेही सांगितले. सध्या ही महिला त्यांच्या नातेवाईकांच्या घरी राहत आहे. त्यांच्या नातेवाईकांशी मनसे कार्यकर्त्यांनी भेट घेतली असून त्यांना लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन मनसे तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर यांनी दिला आहे. Total damage to the house in the storm