गुहागर, ता. 15 : तालुक्यातील पाचेरी सडा बौद्ध वाडी येते डोंगर खचत असल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे कोणताही अनुचीत प्रकार घडलेला नाही, मात्र सुरक्षीतता म्हणून 14 कुटुंबाना स्थलांतरित व्हा अशी नोटीस देण्यात आली आहे. जिल्ह्यातील भुवैज्ञानिकांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली असून मुसळधार पाऊस राहील्यास घरांना धोका पोचून शकतो असे सांगितले आहे. मात्र भेगा पडण्याचे कारण पुणे येथील जीऑग्राफिकल सर्व्हे ऑफि इंडिया हेच सांगू शकतील असेही सांगितले. Mountain fell at Pacheri Sada
तालुक्यातील पाचेरी सडा येथील बौद्धवाडीच्यावरती असलेल्या डोंगराला भेग पडल्यामुळे तेथील डोंगरभाग खाली येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून खबरदारी म्हणून तात्काळ ११ सदस्यांना इतरत्र हलवीले आहे. तर गुहागर तहसिलदार परिक्षित पाटील यांनी त्या ठिकाणाची भूवैज्ञानीक व जीऑग्राफिकल तर्फे पहाणी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे भूवैज्ञानीक माने यांनी घटनास्थळाला भेट दिली. माने यांनी पहाणी केल्यानंतर मुसळधार पाऊस कायम राहीला तर डोंगराचा हा भाग ८० ते १०० मिटरने खाली येऊ शकतो अशी शक्यता वर्तविली होती. मात्र पाऊसाचे प्रमाण कमी राहीले, तर ही माती त्याचठिकाणी घट्ट राहील. परंतु याबाबत जीऑग्राफिकल सर्व्हे ऑफ इंडियातर्फे पहाणी करून तेच अंतिम निर्णय देतील असेही सांगितले होते. त्यामुळे प्रशासनाने तेथील कुटूंबांना स्थलांतरासाठी नोटीस दिली आहे. तसेच रस्त्यावरती आलेली माती जेसीबीच्या साह्याने बाजूला करून रस्ता मोकळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. Mountain fell at Pacheri Sada