गुहागर, ता. 17 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य आणि बळीराज सेना यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक १ जुलै २०२४ रोजी, सांयकाळी ८ वाजता मुख्यमंत्र्याच्या वर्षा या निवास स्थानी कोकणातील कुणबी समाज्याच्या प्रलंबीत प्रश्नांसाठी सभा आयोजित करण्यात आली होती. Tillori Kunbi issue will be solved
कोकणातील कुणबी समाजाला ज्वलंत समस्येमधून जावे लावत आहे. त्यापैकी
१)तिल्लोरी कुणबी समाजाचा OBC च्या यादीत ८३ कुणबी या पोटाजातीत समावेश करण्यात यावा.
२) कोकणातील सर्व जिल्हयात घरठाण जमिनी, शेतजमिनी, देवस्थान इनाम जमीनी, वरकस जमिनी यामध्ये कसेल त्याची जमीन या तत्त्वनुसार बेदखल कुळ वहीवाट दारांना जमिनीचे मालकी हक्क मिळाले पाहिजेत.
३) कोकणातील प्रत्येक तालुक्यात लोकनेते शामराव पेजे कुणबी सांस्कृतिक भवन.
४) लोकनेते शामरावजी पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ मधून व्यवसायिक शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी यांना पत पुरवठा करण्यासाठी जाचक अटी रद्द कराव्यात. Tillori Kunbi issue will be solved
यांसारख्या समस्यांवर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे नेतृत्व कुणबी एकीकरण समिती, महाराष्ट्र व बळीराज सेनेचे अध्यक्ष मा.श्री.अशोकदादा वालम साहेब यांनी केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब, उद्योग मंत्री मा. उदयजी सामंत साहेब यांचे मार्गदर्शनाखाली संबंधित खात्याचे प्रधान सचिव तसेच कुणबी समाजोन्नती संघाचे प्रभारी अध्यक्ष मा.श्री.सदानंद काष्टे, सरचिटणीस अरविंद डाफळे, सरचिटणीस नंदकुमार मोहिते, उपाध्यक्ष सुरेश भायजे, कृष्णाजी कोबनाक, बबन उंडरे, प्रकाश तरळ, कृष्णाजी वने, डॉ. प्रकाश बांगरत इ. अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. Tillori Kunbi issue will be solved


या सभेत तिल्लोरी कुणबी समाजाच्या प्रश्नासंबंधी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग, पुणे यांच्याशी तात्काळ संपर्क साधून तिल्लोरी कुणबी समाजाचा डेटा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जमा करण्यात यावा. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग, पुणे यांनी ठराविक मुदतीत शिफारसी सह राज्य शासनाकडे सुपूर्द करावा, अशा सूचना तात्काळ देण्यात आल्या त्या अनुषंगाने मागासवर्ग आयोगाचे सन्माननीय सदस्य काळेसाहेब व डॉक्टर श्रीमती सरप (लाखाटे) यांच्या उपस्थितीत दिनांक १५ जुलै २०२४ रोजी ओरस (सिंधुदुर्ग) व दिनांक १६ जुलै २०२४ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली. Tillori Kunbi issue will be solved
कुणबी समाजोंन्नतीसंघ मुंबईच्या वतीने तपशीलवार सन १९४० पासून सन २००४ पर्यंत मुंबई राज्य तसेच महाराष्ट्र राज्य यांच्याकडील वेळोवेळी झालेला शासन निर्णय या संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगने तिल्लोरी कुणबी या जातीचा समावेश ओबीसीच्या ८३ कुणबी मध्ये पोट जातीत समावेश करण्यासंबंधी गांभीर्य पूर्ण विचार करून लवकरात लवकर अहवाल सामान्य मुख्यमंत्री महोदयांना सुपूर्द करू. अशी सकारात्मक भूमिका मागासवर्गीय आयोगाने घेतल्यामुळे उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. Tillori Kunbi issue will be solved
या सभेत मा. नंदकुमार मोहिते, अरविंद डाफळे, मा. चंद्रकांत बावकर, मा.सुरेश भायजे, मा.संभाजी काजरेकर, मा. हुंमणे गुरुजी, आगरे गुरुजी, रामचंद्र गराटे, शरदचंद्र गीते, वसंत आंबेलकर, तानाजी कुळये, गजानन धनावडे, संजय साळवी, शांताराम मालप, शांताराम खापरे, श्री. चांदिवडे, दीपक नागले, प्रकाश मांडवकर, राजेश बेंडल, अविनाश लाड, प्रदीप घडशी, सचिन गोवळकर, शरद शिवगण, प्रदिप उदेग, ad.सुजित झीमण यासारखे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. Tillori Kunbi issue will be solved