गुहागर, ता. 15 : गेली तीस वर्षे रंगभूमीवर विविध भूमिका सादर करणारे, रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे, प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे नाट्यकलावंत अभिजीत महादेव भोसले यांचा अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ सलमान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. Theater artist Abhijeet Bhosle felicitated
अभिजीत महादेव भोसले हे गेले अनेक वर्ष विविध नाटकातून विविध भूमिका सादर करत आहेत. प्रेक्षकांना खेळवून ठेवण्याचे त्यांचे सामर्थ्य आहे. एक नाट्य कलावंत म्हणून त्यांचा सर्वत्र परिचय आहे. गेले अनेक वर्ष रंगभूमीची सेवा केल्याबद्दल अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन शृंगारतळी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे सन्मान करण्यात आला. Theater artist Abhijeet Bhosle felicitated
त्यावेळी अध्यक्षस्थानी माजी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक गावणकर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते पराग कांबळे, सरपंच विजय तेलगडे व अखिलचे पदाधिकारी उपस्थित होते. अभिजीत भोसले यांच्या सत्काराबाबत आरे पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे. Theater artist Abhijeet Bhosle felicitated