• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

काताळेतील तरुणाचा अपघाती मृत्यू

by Mayuresh Patnakar
September 14, 2024
in Guhagar
531 5
9
Accidental death of youth

निखिल दिलीप कुळ्ये

1k
SHARES
3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रात्रीच्या वेळी म्हैशीवर दुचाकी आदळली, एक गंभीर

गुहागर, ता. 14 : तालुक्यातील काताळे गावातील निखिल दिलीप कुळ्ये या 23 वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत असलेला साहिल अजित कुळये यांच्या डोक्याला मार लागला असून डेरवण येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. शुक्रवारी (ता 13) रात्री 12 च्या सुमारास पडवे कातळावर दुचाकी म्हैशींवर आदळून हा अपघात झाला. निखिलच्या मृत्यूने काताळे गावावर शोककळा पसरली आहे. Accidental death of youth

शुक्रवारी (ता 13) रात्री निखिल आणि साहील आपल्या मित्रांसह तीन दुचाकी घेवून भजनासाठी रोहीले गावात गेले होते. भजनाचा कार्यक्रम झाल्यावर  निखिल आणि साहील दुचाकीवरुन काताळे गावी परत येत होते. पडवे फाट्यावरुन काताळेच्या दिशेने दुचाकी जात असताना पडवे हायस्कुलजवळ रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडणारी म्हैस दुचाकी चालवणाऱ्या निखिलला दिसली नाही. निखिलची दुचाकी म्हैशींवर आदळली. दुचाकी धडकल्यावर निखिल आणि साहील दोघेही रस्त्यावर आदळले. निखिल जागीच बेशुद्ध पडला. पाठीमागुन येणाऱ्या निखिल, साहील सोबतच्या मित्रांनी हा अपघात पाहीला. तातडीने काताळे गावात संपर्क केला. निखिल व साहीलला मित्र तत्काळ आबलोली प्राथमिक उपकेंद्रात घेऊन गेले. तेथून त्यांना डेरवण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डेरवण येथे पोचेपर्यंत निखिलचा मृत्यू झाला होता. साहीलच्या डोक्याला व पायाला गंभीर मार लागला असून त्याच्यावर डेरवण येथे उपचार सुरु आहेत. Accidental death of youth

डेरवण येथील रुग्णालयातच शवविच्छेदन करुन निखिलचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आज (ता. 14) दुपारी शोकाकुल वातावरणात निखिलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. निखिल विरार येथे रहात होता. तेथील एका दुचाकी वाहनांच्या विक्री व सेवाकेंद्रात तो नोकरीला होता. गौरीगणपतीसाठी तो गावी आला होता. 23 वर्षीय निखिल हा एकमेव तरुण मुलगा हरपल्याने दिलीप कुळ्येंच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. Accidental death of youth

दरम्यान रात्रीच्या वेळी दुचाकीने धडक दिलेली म्हैस ही सुर्वे यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. ही म्हैस देखील या अपघातानंतर मृत पावली आहे. मात्र या अपघाताची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात अद्याप झालेली नाही. सावर्डे येथील पोलीस ठाण्यातून या अपघाताची नोंद शुन्य क्रमांकाने गुहागर पोलीस ठाण्यात दाखल होईल. Accidental death of youth

Tags: Accidental death of youthGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share417SendTweet261
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.