गुहागर, ता. 02 : तालुक्यातील वरवेली येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचें रखडलेले कामे ४५ दिवसात पूर्ण करून देण्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून हमीपत्र व अधिकार्यांच्या आश्वासनानंतर ग्रामपंचायत वरवेली व ग्रामस्थांचें साखळी उपोषण समाप्त करण्यात आले. गुहागर तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जलजीवन मिशन अंतर्गत सार्वजनिक नळपाणी योजनेच्या अपूर्ण कामामुळे वारंवार ग्रा.पं मार्फत पाठपुरावा करून सुद्धा कोणतीही ठोस कार्यवाही अद्याप पर्यंत आलेली नाही. यासंदर्भात गुहागर पंचायत समिती कार्यालयासमोर वरवेली ग्रामस्थ व ग्रामपंचायत वरवेली यांच्यावतीने बुधवारी सकाळपासून साखळी उपोषण करण्यात आले. The hunger strike of Varveli villagers is over
या उपोषणाला उपसरपंच मृणाल विचारे, ग्रामपंचायत सदस्य संदीप पवार, अरुण रावणग, नरेश रांजाणे, सेजल शिंदे, श्रावणी शिंदे, तंटामुक्त समिती अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, जयसिंग शिंदे, पत्रकार गणेश किर्वे, पोलीस पाटील सुजित शिंदे, आशिष विचारे, वैभव पवार, दीपक किर्वे, जितेंद्र विचारे, कुणाल देसाई, दीपक विचारे, अनिल शिंदे, उमेश आगरे, सुधीर विचारे, यांच्या सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. उपोषण स्थळी भारतीय जनता पार्टीचे गुहागर तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, गुहागर नगरपंचायत माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल , शिवसेना गुहागर तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, युवा सेनेचे अमरदीप परचुरे, शहर प्रमूख निलेश मोरे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून उपोषणकर्त्यांच्या व्यथा जाणून गट विकास अधिकारी प्रमोद केळसकर यांच्याजवळ चर्चा तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या जवळ दूरध्वनीद्वारे संपर्क करून ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्यांचा प्रामुख्याने विचार करावा अशी मागणी केली यावर शिल्लक असलेल्या कामासंदर्भात शासन स्तरावरून त्वरित दखल घेण्यात येईल असे आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिले. The hunger strike of Varveli villagers is over