डॉ. नातू, महायुतीच्या उमेदवारचा विजय निश्चित आहे
गुहागर, ता. 14 : रामदास भाईंच्या वक्तव्यावर काल तालुकाध्यक्षांनी जे सांगितले तेच खरतरं उत्तर आहे. याबाबत माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी प्रचारसभेच्या वेळी येईन त्यावेळी या विषयावर बोलेन असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांचा प्रचार अधिक जोमाने करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. असे स्पष्टीकरण भाजपचे गुहागर विधानसभा समन्वयक, माजी आमदार डॉ. विनय नातूं यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. The Chief Minister will speak on Kadam’s statement
माफी नाही तर प्रचार नाही अशी भुमिका घेणाऱ्या भाजपने आता ताकदीनिशी राजेश बेंडल यांच्या प्रचारात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती आज डॉ. नातुंनी यांनी शृंगारतळी येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेवून दिली. डॉ. नातू म्हणाले की, याआधी गुहागरमध्ये अनेकवेळा नातू विरुध्द बेंडल अशा लढती झाल्या. मात्र त्यामध्ये सामाजिक कटुता आली नाही. मात्र काही शक्ती सध्या एकत्र येवून महायुतीच्या उमेदवाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजणांच्या वक्तव्यामुळे काल प्रचार थांबला होता. मात्र कार्यकर्त्यांना पुन्हा तितक्याच जोमाने प्रचार करतील. त्यांच्या वक्तव्याला यापूर्वी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी जोरदार उत्तर दिले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा आमच्या तालुकाध्यक्षांने विस्तृत पध्दतीने त्यांच्या चुकीच्या वक्तव्यावर योग्य पध्दतीने मुद्देसुद उत्तर दिले आहे. यापुढे आमचा बुथप्रमुखही तितक्याच ताकदीने उत्तर देईल इतका सक्षम आहे. मात्र सध्या 20 तारखेपर्यंत ही ताकद महायुतीच्या प्रचारासाठी वापरण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. The Chief Minister will speak on Kadam’s statement
लोकसभेच्या निवडणुकीतील तफावत दूर करुन महायुतीचा उमेदवार जिंकून आला पाहीजे. यासाठी आम्ही नियोजन केले. फक्त मतदारसंघ जागा वाटपात बदलला. पुढे उमेदवारी निश्चित करण्यात वेळ गेला. स्वाभाविकपणे समन्वयाच्या बैठकीला उशीर झाला. मात्र त्यानंतर भाजपचा कार्यकर्ता प्रचार करु लागला आणि झपाट्याने मतदारसंघातील वातावरण महायुतीसाठी अनुकुल होऊ लागले. पुन्हा एकदा काही मंडळींनी महायुती अडचणीत येण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांचा अपेक्षाभंग होणार हे निश्चित आहे. भारतीय जनता पक्ष राष्ट्र प्रथम ही भुमिका घेवून काम करणारा पक्ष असल्याने उमेदवार कोणत्या पक्षाचा याचा विचार न करता आम्ही कामाला लागलो आहोत. लोकसभेत आम्हाला मोदीजींचे हात बळकट करायचे होते. आता महाराष्ट्रात देवद्रेजींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. The Chief Minister will speak on Kadam’s statement
2009 मध्ये गुहागरच्या उमेदवारीवरुन काय घडले याची इनसाईड स्टोरी सांगताना डॉ. नातू म्हणाले की, जागा वाटप निश्चित झाल्यानंतर तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांनी उमेदवारीसाठी हट्ट धरला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेनी विरोधी पक्ष नेत्याला नातुंची भेट घेण्यास सांगितले. भेटीची वेळ घेण्यासाठी शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख मार्गताम्हान्यातील एका घरात थांबले. माझ्या घरात कार्यकर्त्यांची गर्दी होती. भेट घेवून आमची चर्चा झाल्यानंतर थेट बाळासाहेबांसोबत बोलायचे आणि निर्णय घ्यायचा असे नियोजन होते. मात्र विरोधी पक्ष नेते परशुरामचा घाट उतरलेच नाहीत. त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना कात्रजचा घाट दाखवला. त्याची परिणीती काय झाली ते तुम्हाला माहीती आहेच. परंतु त्यानंतर 2013 मध्ये आम्ही दोघे दोन देवळात एकत्र जावून पूजा करुन आलो. अनेकदा कार्यकर्त्यांसमवेत एकत्र पंगतीला बसलो. या गोष्टी कोणतीही चर्चा झाल्याशिवाय होत नाही. त्त्यावेळी आमच्या सोबत असलेले अनेक कार्यकर्ते आजही पदाधिकारी आहेत. हे सर्व नुकतेच घडले आहे. मात्र जुन्या मित्रांच्या भावना जागृत होवून इथल्या महायुतीच्या उमेदवाराला अडचणीत आणण्याचा डाव तर नाहीना अशी शंका त्यांनी बाळासाहेंबांचे नाव घेतल्याने येते आहे. The Chief Minister will speak on Kadam’s statement
अन्य नेत्याला विचारुन कोणता पक्ष उमेदवारी देतो
रामदास भाईंनी उल्लेख केलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भांबाबत बोलताना नातू म्हणाले की, भाजपच्या उमेदवारीचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत होतो. फडणवीस या बोर्डाचे सदस्य असल्याने त्यांनाही याची माहिती आहे. अशा स्थितीत अन्य पक्षाच्या नेत्याला विचारुन देंवेंद्रजी उमेदवार कसा ठरवतील. तसेच कोणत्या पक्षाचा नेता अन्य पक्षातील नेत्याला विचारुन उमेदवार ठरवतो. एवढी साधी गोष्ट यांना माहिती नाही का. ते काहीही बोलले तरी लोक अशा गोष्टींवर विश्र्वास ठेवतील का. The Chief Minister will speak on Kadam’s statement
महायुतीच विजयी होणार
निवडणुकीचा प्रचार दुसऱ्या टप्प्यात पोचला आहे. सध्याच्या स्थितीचा विचार करता गुहागर मतदारसंघात राजेश बेंडल यांच्यासाठी वातावरण पोषक आहे. उरलेल्या दिवसांतही महायुती म्हणून आम्ही वेगाने प्रचार करु. त्यामुळे अंतिम विजय हा महायुतीचाच असेल. The Chief Minister will speak on Kadam’s statement