• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

देशाच्या प्रगतीला विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड असणे गरजेचे

by Ganesh Dhanawade
December 23, 2024
in Guhagar
127 2
0
Taluka Level Science Exhibition
250
SHARES
715
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर;  तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

गुहागर, ता. 23 : देशाच्या प्रगती करता विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड असणे महत्त्वाचे आहे. यामुळे प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्याच्यातील विज्ञान कला कौशल्याला वाव मिळावं यासाठीचे हे विज्ञान प्रदर्शन प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद केळकर यांनी केले. Taluka Level Science Exhibition

गुहागर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने आणि रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पालशेत यांच्या विद्यमाने 52 वे गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे गटविकास अधिकारी प्रमोद केळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, तालुक्यातील प्राथमिक शाळेतील व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतलेला सहभागामुळे खऱ्या अर्थाने प्राथमिक शाळेपासूनच विद्यार्थ्यांना विज्ञानाची कास धरली आहे. त्याचबरोबर शाळांनी माझी वसुंधरा यामध्येही सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. Taluka Level Science Exhibition

Taluka Level Science Exhibition

गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विज्ञान प्रदर्शन सुरू असून पालशेत मध्ये डॉ. होमी भाभा विज्ञान नगरी सजली आहे. या प्रदर्शनामध्ये एकूण 111 प्रतिकृतीने सहभाग घेतला आहे. यामध्ये प्राथमिक विद्यार्थी 62 माध्यमिक विद्यार्थी 24 प्राथमिक शिक्षक 10 माध्यमिक शिक्षक सात दिव्यांग प्राथमिक विद्यार्थी तीन दिव्यांग माध्यमिक विद्यार्थी दोन आणि प्रयोगशाळा परिचय तीन असा सहभाग आहे. Taluka Level Science Exhibition

गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे प्रास्ताविक केले. यावेळी रयत शिक्षण संस्था सातारा जनरल कौन्सिल सदस्य प्रशांत पालशेतकर, पत्नी शितल पालशेतकर यांची उपस्थिती लाभली.  स्कूल कमिटी सदस्य पंकज बिर्जे यांनी सर्वांचे स्वागत केले. रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुदेश कदम ,  मुख्याध्यापक संघाचे गुहागर तालुका अध्यक्ष श्री. मंगेश गोरिवले,  गुहागर तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष जी. एल. पाटील, प्रमोद नेटके, बाबासाहेब राशिनकर, रवींद्र कोळी, सुहास गायकवाड तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. Taluka Level Science Exhibition

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarTaluka Level Science ExhibitionUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share100SendTweet63
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.