गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर; तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
गुहागर, ता. 23 : देशाच्या प्रगती करता विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड असणे महत्त्वाचे आहे. यामुळे प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्याच्यातील विज्ञान कला कौशल्याला वाव मिळावं यासाठीचे हे विज्ञान प्रदर्शन प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद केळकर यांनी केले. Taluka Level Science Exhibition
गुहागर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने आणि रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पालशेत यांच्या विद्यमाने 52 वे गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे गटविकास अधिकारी प्रमोद केळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, तालुक्यातील प्राथमिक शाळेतील व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतलेला सहभागामुळे खऱ्या अर्थाने प्राथमिक शाळेपासूनच विद्यार्थ्यांना विज्ञानाची कास धरली आहे. त्याचबरोबर शाळांनी माझी वसुंधरा यामध्येही सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. Taluka Level Science Exhibition


गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विज्ञान प्रदर्शन सुरू असून पालशेत मध्ये डॉ. होमी भाभा विज्ञान नगरी सजली आहे. या प्रदर्शनामध्ये एकूण 111 प्रतिकृतीने सहभाग घेतला आहे. यामध्ये प्राथमिक विद्यार्थी 62 माध्यमिक विद्यार्थी 24 प्राथमिक शिक्षक 10 माध्यमिक शिक्षक सात दिव्यांग प्राथमिक विद्यार्थी तीन दिव्यांग माध्यमिक विद्यार्थी दोन आणि प्रयोगशाळा परिचय तीन असा सहभाग आहे. Taluka Level Science Exhibition


गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे प्रास्ताविक केले. यावेळी रयत शिक्षण संस्था सातारा जनरल कौन्सिल सदस्य प्रशांत पालशेतकर, पत्नी शितल पालशेतकर यांची उपस्थिती लाभली. स्कूल कमिटी सदस्य पंकज बिर्जे यांनी सर्वांचे स्वागत केले. रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुदेश कदम , मुख्याध्यापक संघाचे गुहागर तालुका अध्यक्ष श्री. मंगेश गोरिवले, गुहागर तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष जी. एल. पाटील, प्रमोद नेटके, बाबासाहेब राशिनकर, रवींद्र कोळी, सुहास गायकवाड तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. Taluka Level Science Exhibition