संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 19 : सेवार्थ उपक्रमासाठी चळवळ करणा-या ‘कोकण कट्टा’ या संस्थेमार्फत हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. Talawali High School’s success in handwriting competition
कोकण कट्टा या संस्थेने २७ फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने शाळाअंतर्गत इयत्ता पाचवी ते सहावी लहान गट व इयत्ता सातवी ते नववी मोठा गट अशा दोन गटात हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केल्या होत्या. दोन्ही गटात एकूण 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी लहान गटात कु.मंथन योगेश साळवी इयत्ता सहावी याने प्रथम, कु.समर्थ किशोर चिवेलकर इयत्ता सहावी याने द्वितीय तर कु.स्वरा प्रवीण साळवी इयत्ता पाचवी हिने तृतीय क्रमांक पटकावला. मोठ्या गटात कु.सायली दत्ताराम पिंपळकर इयत्ता नववी ब हिने प्रथम क्रमांक, कु.आयुषी सुभाष डाकवे इयत्ता नववी ब हिने द्वितीय क्रमांक तर कु.दिक्षा महेंद्र पडवळ इयत्ता नववी अ हिने तृतीय क्रमांक पटकावला. Talawali High School’s success in handwriting competition


या सर्व सुयश प्राप्त विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार, श्री.साळुंके, सौ.नाईक मॅडम, श्री. देवरुखकर, श्री.केळस्कर, श्री.कुळे, श्री.गवळी, यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन जेष्ठ शिक्षक श्री.साळुंके सर यांनी केले होते. तसेच श्री.देवरुखकर सर व श्री.कुळे सर यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी श्री.देवरुखकर सर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. Talawali High School’s success in handwriting competition