• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
19 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

by Guhagar News
December 21, 2024
in Ratnagiri
65 1
1
Swadhar Yojana
127
SHARES
364
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दीपक घाटे;  नोंदणीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी, ता. 20 : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तरी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन नोंदणीकृत करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे. Swadhar Yojana

१० वी नंतरच्या अभ्यासक्रमांना (११ वी, १२ वी) व १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांसाठी https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन राबविण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे सन २०२४- २५ साठी अर्ज करण्यास दि. १६ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. Swadhar Yojana

विद्यार्थ्यांचे उशीरा सुरू होणारे शैक्षणिक सत्र, सद्यस्थितीत स्वाधार योजनेचा लाभ घेत असलेले विद्यार्थी, तसेच नव्याने स्वाधार योजनेसाठी अर्ज करणारे विद्यार्थी यांना ऑनलाईन अर्ज करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. या बाबी विचारात घेऊन अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता सन 2024-25 या वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दि. 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. Swadhar Yojana

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSwadhar YojanaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share51SendTweet32
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.