गुहागर, ता. 21 : चांगले मित्र जोडावे, इंजिनिअरिंग, मेडिकल, सीए.याबरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. या मार्गदर्शनासाठी लागणारी पुस्तके ज्ञानरश्मी वाचनालय तुम्हाला नेहमीच मदत करेल प्रतिपादन राजेंद्र आरेकर यांनी केले. ज्ञानरश्मी सार्वजनिक वाचनालय गुहागर तर्फे इयत्ता १0 वी व १२ वी मध्ये सर्वोत्कृष्ट गुण संपादन केलेल्या विद्यार्थांचा सत्कार श्री दे गो कृ. मा. वि. व कनिष्ठ महाविद्यालय येथे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर बोलत होते. Students felicitated by Gnanarashmi Library
यावेळी गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांनी विदयार्थ्यांच्या यशाचे कौतूक करीत ज्ञानरश्मी वाचनालय विदयार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम, मार्गदर्शक शिबिरे भरवतात व प्रगतीसाठी हातभार लावतात. सर्व विदयार्थ्यांनी ज्ञानरश्मी वाचनालयाचा ज्ञानसंर्वधनासाठी उपयोग करावा, असे आवाहन आपल्या भाषणातून केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रभूनाथ देवळेकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य विलास कोरके, प्राध्यापक दत्तात्रय मेटकरी, प्रा.रिया पालशेतकर, ज्ञानरश्मी वाचनालयाच्या ग्रंथपाल गौरी घाडे, सानिका जांगळी, उपस्थित होते. Students felicitated by Gnanarashmi Library
या कार्यक्रमामध्ये कु सेजल चंद्रकांत गोविले, कु. साजित केळकर, कु. नवदीप संतोष गमरे, कु. आर्या मनोज पाटील, कु ऋतूजा अवेरे, कु. रिद्धी धावडे, कु. सेजल भेकरे व पालक उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.मनाली बावधनकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा.रिया पालशेतकर यांनी केले. Students felicitated by Gnanarashmi Library