गुहागर, ता. 14 : गेले 31 वर्षाची परंपरा अखंडितपणे उपक्रम सुरू ठेवत असताना अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचा विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज सभागृह पाटपन्हाळे ग्रामपंचायत हॉल येथे निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक गावणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. Student Appreciation Ceremony by Teachers Union


सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे व पाटपन्हाळे येथील सरपंच श्री विजय तेलगडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमांमध्ये इयत्ता दहावी, बारावी, पाचवी शिष्यवृत्ती, आठवी शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षा ,नासा, इसरो मध्ये निवड झालेले विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक यांचा गौरव करण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमाला सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक व गुहागर तालुक्यातील सर्व अखिल परिवारातील सदस्य यांनी वेळीच उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ मनोज पाटील व सरचिटणीस प्रकाश जोगळे यांनी केले आहे. Student Appreciation Ceremony by Teachers Union