बौद्धजन सहकारी संघ (रजि.) व भारतीय बुद्ध सासन सभा, तालुका गुहागर यांच्या वतीने
गुहागर, ता. 09 : बौद्धजन सहकारी संघ (रजि.) व भारतीय बुद्ध सासन सभा, तालुका गुहागर यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार गुहागर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. या निवेदनात पुढील चार विषय मांडण्यात आले आहेत. Statement to Chief Minister through Tehsildar Guhagar
१) परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी असणाऱ्या भारताच्या संविधानशिल्प प्रतीकृतीची मोडतोड करून विटंबना करणाऱ्या व्यक्तीवर समाज द्रोहाचा व देश द्रोहाचा गुन्हा दाखल करणे बाबत.
२) परभरणी येथे संविधान प्रेमींवर व आंबेडकर चळवळीतील भिमसैनिक दिवंगत सोमनाथ सुर्यवंशी यांना अमानुष मारहाण करून खुन करणाऱ्या पोलिस अधिकारी अशोक घोरबांड व त्यांच्या सहकार्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा देणे बाबत.
३) भारत देशाचे केंद्रिय मंत्री अमित शहा यांनी थोर घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल दृष्ट हेतूने केलेल्या वक्तव्या बाबत त्यांनी त्वरीत मंत्री पदाचा राजीनामा द्यावा व तमाम आंबेडकरी जनतेची व भारतीयांची जाहिर माफी मागावी.
४) बीड मधील मत्स्याजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याखंडातील मारेकरांना कठोर शिक्षा व्हावी. Statement to Chief Minister through Tehsildar Guhagar
उपरोक्त विषयांन्वये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, विश्वरत्न, अर्थतज्ञ, ज्ञानाचे प्रतिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा परिसरात संविधान प्रतीकृती शिल्पाची ११ डिसेंबर २०२४ रोजी एका समाजद्रोही, देशद्रोही व्यक्तीने तोडफोड करून विटंबना केली. याच्या निषेधार्थ परभणी येथिल विविध सामाजिक संघटनाकडून निषेध मोर्चाचे आयोजन करून सदर घटनेचा निषेध करण्यात आला याचा राग मनात धरून पोलीस खात्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी निष्पाप महिला, पुरुष व युवकांना अमानुष मारहाण केली त्या दरम्यान परभणी येथे संविधान प्रेमींवर व आंबेडकर चळवळीतील भिम सैनिक श्री. सोमनाथ सुर्यवंशी यांना अमानुष मारहाण करून खुन करणाऱ्या पोलिस अधिकारी अशोक घोरबांड व त्यांच्या सहकार्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करुन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. भारत देशाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी थोर घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल दृष्ट हेतूने केलेल्या वक्तव्या बाबत त्यांनी त्वरीत मंत्री पदाचा राजीनामा द्यावा व तमाम आंबेडकरी जनतेची व भारतीयांची जाहीर माफी मागावी. असे निवेदनात म्हटले आहे. Statement to Chief Minister through Tehsildar Guhagar
या निवेदनावर बौद्धजन सहकारी संघ रजिस्टर व भारतीय बुद्ध सासन सभा गुहागर तालुका अध्यक्ष सुरेश सावंत, उपाध्यक्ष विद्यारधर कदम, कार्याध्यक्ष मारुती मोहिते, सरचिटणीस सुनील गमरे, कोषाध्यक्ष वसंत कदम, सासन सभा गुहागर तालुकाप्रमुख एस एल सुर्वे, दत्ताराम कदम, वैभव गमरे, राकेश पवार, मनोज गमरे, सुरेश जाधव, प्रभाकर मोहिते, सचिन पवार, विनोद यादव आदी मान्यवरांच्या सह्या आहेत. बौद्धजन सहकारी संघ व भारतीय बुद्ध सासन सभा यांचा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोलीस परेड ग्राऊंड पर्यंत मोर्चा काढण्यात आला. पोलीस परेड ग्राउंड वर या मोर्चाचे सभेत रुपांतर करण्यात आले यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, बुद्ध सासन सभेचे तालुकाप्रमुख एस एल सुर्वे, त्यानंतर बौद्धजन सहकारी संघ तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांनी सभेला संबोधित केले. या मोर्चामध्ये तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते. Statement to Chief Minister through Tehsildar Guhagar