रत्नागिरी, ता. 10 : येथील कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. शाळेत एक वर्ष आड स्नेहसंमेलन, क्रीडा महोत्सव भरवला जातो. यामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी स्लो सायकलिंग स्पर्धा घेण्यात आली. विद्यालयाच्या योग शिक्षिका सौ. मलुष्टे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेची सुरवात करण्यात आली. Sports Festival at Agashe School
अतिशय हळूहळू सायकल चालवण्याचा प्रयत्न छान झाला. सोपी वाटली तरी थोडीशी अवघड वाटणारी ही स्लो सायकलिंग स्पर्धा मुलांनी खूप आनंदाने मजा केली.
इयत्ता तिसरी व चौथीचे लंगडी व डॉजबॉलचे सामने झाले. इयत्ता पहिली व दुसरीचे लंगडीचे सर्वच सामने चुरशीचे झाले. विजेत्या संघांना चषक देण्यात आले. पालक आणि आजी-आजोबा यांचाही क्रीडा दिन झाला. पालक व आजी आजोबा हे अगदी उत्साहात सहभागी झाले. श्री. वायंगणकर आजोबांच्या हस्ते श्रीफळ वाढवून खेळांना सुरवात झाली. संगीत खुर्ची, लिंबू चमचा, बादलीत चेंडू टाकणे आणि योगासनं या स्पर्धा झाल्या. सर्वच खेळ व योगासने यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. Sports Festival at Agashe School
विद्यालयाचे प्रबंधक विनायक हातखंबकर हे आजोबा म्हणून सर्व खेळांमध्ये उत्साहात सहभागी झाले. क्रीडा दिनाची शपथ घेऊनच सामन्यांची सुरुवात झाली. शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि आजी, आजोबा सर्वांनीच क्रीडा महोत्सवाचा आनंद घेतला. अतिशय चैतन्यमय वातावरणात क्रीडा महोत्सव झाला. Sports Festival at Agashe School