गुहागर, ता. 24 : तालुक्यातील पडवे केंद्राच्या हिवाळी क्रिडा स्पर्धा यावर्षी शाळा तवसाळ तांबडवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत नुकत्याच उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेंत काताळे नं. १ या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. Sports competition held at Tavasal


काताळे नं. १ या शाळेच्या विद्यार्थ्यांनी खो खो स्पर्धेत मुले मोठ्या गटात उपविजेता, लंगडी स्पर्धेत मुलींनी मोठ्या गटात विजेता ठरल्या, तर उंच उडी स्पर्धेत मोठ्या गटात कु. संस्कृती गजानन बारस्कर हिने प्रथम क्रमांक पटकावला तर थालिफेक स्पर्धेत मोठ्या गटात कु. आर्या विनोद बारस्कर हिने व्दितीय क्रमांक, धावणे या स्पर्धेत मोठ्या गटात कु. संस्कृती गजानन बारस्कर हिने प्रथम क्रमांक, लांब उडी स्पर्धेत लहान गटात कु. सेजल बारस्कर हिने व्दितीय क्रमांक, पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे व मुख्याध्यापक तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे आणि स्वरचित कविता सादर करणा-या कु. प्रतिक्षा नितीन बारस्कर हिचे काताळे पंचक्रोशी मधून अभिनंदन करण्यात आले. Sports competition held at Tavasal

