जीवनात खेळाचे स्थान अनन्यसाधारण गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे
गुहागर, ता. 03 : जीवनात खेळाचे स्थान अनन्यसाधारण असून सुदृढ शरीरात सुदृढ मन वास्तव्य करीत असते. विविध खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व क्षमता, खिलाडी वृत्ती, आत्मविश्वास, चिकाटी, जिद्द या गुणांचा विकास होतो. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक क्षमता, सांघिक भावना, सहकार्य वृत्ती विकसित होते, पंचांनी दिलेला निर्णय मान्य करून विद्यार्थ्यांनी मैदानामध्ये आपला खेळ दाखवावा, या स्पर्धेतूनच राष्ट्रीय स्तरावरचे चांगले खेळाडू निर्माण होतील, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे प्रमुख गुहागर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे साहेब यांनी केले. Sports competition held at Bhatgaon
रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती गुहागर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा जुगाई सोमजाई क्रीडा नगरी भातगाव येथे उत्साह पूर्ण वातावरणामध्ये सुरुवात झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन गुहागरचे गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे साहेब व मान्यवर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भातगावचे सरपंच सुशांत मुंडेकर हे होते. लेझीमच्या तालावर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कोतलूक शाळेतील विद्यार्थ्यांनी कलाशिक्षक महेश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. तसेच भातगाव गोळेवाडी, सडे जाभारी, निगुंडळ त्रिभुवन वाडी या शाळेने क्रीडा नृत्य सादर केले. तसेच प्रशस्त रांगोळी काढण्यात आली होती. मैदानात ठिकठिकाणी दिग्गज खेळाडूंचे फोटो लावण्यात आलेले होते. Sports competition held at Bhatgaon
या स्पर्धेमध्ये मोठा गट मुले कबड्डी अडुर बीट विजेता तर उपविजेता गुहागर बीट, खो-खो अडूर विजेता तर उपविजेता आबलोली बीट, मोठा गट मुली अडूर बीट विजेता तर उपविजेता गुहागर बीट, खो-खो मुली आबलोली बीट विजेता तर उपविजेता अडुर बीट, लंगडी आबलोली बीट विजेता तर उपविजेता गुहागर बीट, धावणे प्रथम रोहन गावणकर, द्वितीय प्रणव चव्हाण, लांब उडी प्रथम सार्थक दिलीप आग्रे, द्वितीय सुरज श्रीराम रेवाळे, उंच उडी प्रथम मृणाल मिसाळ, द्वितीय नैतिक केंबळे, थाळीफेक प्रथम अथर्व पवार, द्वितीय शैलेश मस्कर, गोळा फेक प्रथम एकदंत काताळकर, द्वितीय अमर भुवड, धावणे प्रथम चिन्मय शिगवण, द्वितीय पायल घाणेकर, लांब उडी प्रथम आर्या चिवलकर, द्वितीय पार्थ वी अवेरे, उंच उडी प्रथम पायल घाणेकर, द्वितीय वृषाली जगताप, थाळीफेक प्रथम मधुरा मोहिते, द्वितीय पार्थवी अवेरे या सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह भेटवस्तू व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. Sports competition held at Bhatgaon


त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे, विस्तार अधिकारी केशव क्षीरसागर, विस्तार अधिकारी विश्वास खर्डे, केंद्रप्रमुख आरोही शिगवण, केंद्रप्रमुख परवेज चिपळूणकर, केंद्रप्रमुख निकम, केंद्रप्रमुख गायकवाड, केंद्रप्रमुख महेंद्र रेडेकर, केंद्रप्रमुख प्रकाश जोगळे, रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे उपाध्यक्ष अरविंद पालकर, शिक्षण समन्वय समितीचे निमंत्रक कैलाश शार्दुल, समितीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बेलेकर, संघाचे तालुकाध्यक्ष रवींद्र कुळे, अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोज पाटील, उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष साजिद मुकादम, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुहास गायकवाड, अपंग शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दशरथ कदम, जुनी पेन्शन संघटनेचे सरचिटणीस प्रभू हंबर्डे, सामाजिक कार्यकर्ते रामजी मोरे, व्यावसायिक, अमितजी कदम, जुगाई देवस्थानचे पदाधिकारी श्रीराम कदम, गावकर रवींद्र मुंडेकर, धीरज मुंडेकर, सरपंच सौ डिंगणकर, भातगाव धक्का सरपंच आग्रे, सौ पाष्टे, संतोष सावकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश कदम, सुभाष गावडे, अरविंद कदम, पोलीस पाटील मोहिते, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा धावडे मॅडम, माजी विस्तार अधिकारी मुलाणी, प्रभाकर कदम, उपसरपंच प्रशांत बेर्डे, प्राथमिक आरोग्य केंद्र कोळवली चे वैद्यकीय अधिकारी व सर्व टीम, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सदस्य, सर्व ग्रामस्थ, गावकर, जिल्हा पंच नरेंद्र देवळेकर, प्रभू हंबर्डे, निलेश खामकर, संतोष मुंडेकर, दशरथ कदम, गुहागर तालुका क्रीडा समिती पदाधिकारी व पंचशिक्षक तसेच हजारो विद्यार्थी उपस्थित होते. Sports competition held at Bhatgaon
सामन्याचे उद्घाटन सरपंच सुशांत मुंडेकर व सर्व मान्यवर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश जागकर व सावंत सर यांनी केले. क्रीडा स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी गुहागर तालुका शिक्षक समन्वय समिती, पंच, क्रीडा समिती तसेच आबलोली बीट येथील सर्व शिक्षकांनी केले. Sports competition held at Bhatgaon