एकाच दिवशी ब्रॉन्झ व सिल्वर मेडलची मानकरी
संदेश कदम, आबलोली
गुहागर ता. 12 : ठाणे वांगणी येथे निमंत्रीत कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा २०२३ नुकत्याच संपन्न झाल्या. या कराटे विनर स्पर्धेत गुहागर आबलोली (वरची पागडेवाडी) मधील कु. श्रृती श्रीधर पागडे हिने दैदिप्यमान यश संपादन केले. तिने एकाच दिवशी ब्रॉन्झ व सिल्वर मेडल पटकावली. Shruti Pagde success in karate competition
गुहागर तालुक्यातील आबलोली गावाची (वरची पागडेवाडी) सुकन्या कु. श्रृती श्रीधर पागडे हिने कराटे विनर स्पर्धेत यश संपादन केले. तिने मिळविलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल आबलोली वरची पागडेवाडी विकास मंडळ व या मंडळाचे अध्यक्ष श्री.मधुकर पागडे, सेक्रेटरी श्री.गोविंद पागडे यांनी कु. श्रृती श्रीधर पागडे हिचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. Shruti Pagde success in karate competition
यावेळी आबलोलीच्या सरपंच सौ.वैष्णवी नेटके, श्री. विलास बाळू पागडे, दत्ताराम पागडे, शुभाष पागडे, सुरेश ठोंबरे, राजेश घाणेकर, किरण पागडे, सचिन पागडे, विनोद शितप, सुर्यकांत पागडे, कान्हा पागडे, प्रमोद शितप, नितीन पागडे, मंगेश पागडे, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम, कृषि पुरस्कार प्राप्त सचिन कारेकर, पागडे परीवार, महाराष्ट्रराज्य अध्यक्ष श्री.सुर्यकांत पागडे, ( दापोली), महेन्द्र पागडे, प्रकाश पागडे, रमेश पागडे तसेच गावातील बहुसंख्य मान्यवर मंडळींनी तिच्या या यशाबद्दल प्रत्यक्ष व सोशल मिडियाद्वारे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. Shruti Pagde success in karate competition