• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 May 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण तालुक्यात अवैध वृक्षतोड

by Mayuresh Patnakar
October 12, 2023
in Ratnagiri
100 1
1
Illegal felling of trees in Chiplun Taluk
196
SHARES
559
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वन विभागाची धडक कारवाई

गुहागर, ता. 12 : चिपळुण वन विभागास मिळालेल्या बातमीनुसार चिपळूण तालुक्यात अवैध वृक्षतोड सुरु आहे. वीर, नारदखेरकी, निळ, निर्हाळ परिसरात अवैध वृक्षतोड सुरु असुन येथे मिळून आलेला लाकूडमाल जप्त करणेत आला आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व नागरिकांना वन विभागामार्फत आवाहन करणेत येते की, विनापरवाना वृक्षतोड हा दंडनीय अपराध असून संबधीताविरूध्द सदर गुन्हा केलेबाबत महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम कायद्यांतर्गत तात्काळ कारवाई करणेत येईल. Illegal felling of trees in Chiplun Taluk

Illegal felling of trees in Chiplun Taluk

मौजे वीर येथील मालकी सर्व्हे नंबर १७२९ मध्ये विनापरवाना वृक्षतोड आढळून आल्याने महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम १९६४ नुसार कारवाई सुरू केली आहे. सदर ठिकाणी मनाई जातीचे एकूण १४५ झाडे व बिगर मनाई प्रजातीलमधील – १०८ अशी एकूण २५३ झाडे अवैद्य वृक्षतोड केल्याचे दिसून आले आहे. सदर झाडापासून मनाई- बिगर मनाई जळावू किटा २२८.०० घनमीटर आणि इमारती अनगड नग २१ ३.७४० घनमिटर इतका मिळून आलेला लाकूडमाल जप्त करणेत आला आहे. जप्त केलेला लाकूड माल संरक्षणाकरीता तात्पुरत्या स्वरूपात पंचासमक्ष  महादेव हरी वीरकर यांचे ताब्यात देण्यात आलेला आहे. सदरच्या अवैध वृक्षतोडीबाबत संबधीता विरूध्द वन विभागामार्फत दंडआदेश निर्गमित करणेत आले आहेत. तसेच जप्त माल सरकारजमा करण्याचे आदेश होवून त्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. Illegal felling of trees in Chiplun Taluk

 मौजे नारदखेरकी येथील मालकी सर्व्हे गट नंबर ११८८ येथील पाहणीमध्ये सुध्दा सदर ठिकाणी अवैद्यवृक्षतोड झालेली दिसून आली. त्यामध्ये मनाई वृक्ष १० व बिगर मनाई ९५ अशी एकूण १०५ झाडांची तोड झालेली आहे. सदर झाडांपासून मनाई – बिगर मनाई जळावू किटा इ ८९.९०० घनमिटर व आकेशिया अनगड नग १०० / ५.६३० घनमीटर ऐवढा मिळूण आला आहे. सदर लाकूड माल जप्त करून तात्पुरत्या स्वरूपात पंचासमक्ष  शिवाजी अंबाजी यादव यांच्या ताब्यात देणेत आलेला आहे. सदर प्रकरणी संबधीता विरूध्द वन विभागा मार्फत दंड आदेश निर्गमित करणेत आले असून पुढील कारवाई सुरू आहे. Illegal felling of trees in Chiplun Taluk

Illegal felling of trees in Chiplun Taluk

मौजे निळ गावातील दशरथ नारायण कदम, रा. निर्हाळ यांचे मालकी क्षेत्रात मनाई जातीची २३ झाडे विना परवाना तोडून त्यापसुन इमारती नग १२/१.०६६ व जळावू किटा ४.८६८ इतका लाकुडमाल तयार केला आहे. सदर वृक्षतोड दशरथ दत्ताराम जाधव, रा. रावळगाव यांनी केला असून विना परवाना इ पाडतोडीचा गुन्हा त्यांनी कबुल केला आहे. Illegal felling of trees in Chiplun Taluk

तसेच मौजे निर्हाळ गावचे सरपंच व पोलीस पाटील यांचे समवेत गाव परिसराची फिरती केली असता रमेश सदाशिव सावंत रा. निळ यांचे मालकी क्षेत्रामध्ये तोड आढळून आली परंतू त्यांनी साग – ४० झाडे तोडण्याबाबत विहीत परवानगी प्राप्त करून घेवून तोड केली असल्याचे दिसून आले या व्यतिरिक्त सदर गावचे क्षेत्रामध्ये तोड आढळून आली नाही. Illegal felling of trees in Chiplun Taluk

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiIllegal felling of trees in Chiplun TalukLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share78SendTweet49
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.