वरवेली आगरवाडी विकास मंडळातर्फे वसई (पश्चिम) येथे आयोजन
गुहागर, ता. 23 : तालुक्यातील वरवेली आगरवाडी विकास मंडळातर्फे शिवतेज चषक 2025 ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा उमेनमाल मैदान, हनुमान नगर, शंकर मंदिर जवळ, वसई (पश्चिम) येथे खेळवण्यात येणार असून प्रवेश फी रू. 2500/- आहे. तरी सर्व खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. Shivtej Cup 2025 Cricket Tournament


या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु. 15,001/- व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रु. 10,001/- व आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक रु. 3,001/- व आकर्षक चषक, तसेच गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर यांना उत्कृष्ट चषक देण्यात येणार आहे. Shivtej Cup 2025 Cricket Tournament
या स्पर्धेचे नियम व अटी
. ही स्पर्धा गुहागर तालुका मर्यादित असेल.
. स्पर्धा वाडी टू वाडी 24 संघांमध्ये खेळली जाईल.
. प्रत्येक सामना हा 3-4 षटकांचा असेल.
. धावा कम्पल्सरी चेस असतील.
. पंचांचा आणि कमिटीचा निर्णय अंतिम असेल.
. पंचांशी वाद घातल्या संघ बाद करण्यात येईल.
. खेळाडूला दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
. सर्व सामने हे दोन सिमेंट पिच वर खेळवले जातील.
. नियम क्रमांक 1 ला अनुसरून आपल्या संघात खेळणारा खेळाडू हा गुहागर तालुक्यातील आणि नोंद केलेल्या गावातील/वाडीतील असावा याची काळजी त्या संघाच्या कर्णधाराने घ्यावी.
. फेकी गोलंदाजी ग्राह्य धरली जाणार नाही.
. सामने सकाळी 8 वाजता चालू होतील.
. प्रत्येक संघाने दिलेल्या वेळेच्या 15 मिनिटे अगोदर उपस्थित राहावे, अनिवार्य आहे.
. प्रवेश निश्चित करण्यासाठी ॲडव्हान्स रु. 1000/- देणे बंधनकारक असेल.
. प्रत्येक खेळाडूचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
. उर्वरित नियम मैदानामध्ये सांगण्यात येतील. Shivtej Cup 2025 Cricket Tournament

