गुहागर, ता. 09 : गुहागर पंचायत समिती आयोजित गुहागर तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन 2024 – 25 स्पर्धा भातगाव येथे आई जुगाई देवी मंदिर परिसरातील क्रिडांगणात संपन्न झाल्या. या स्पर्धेत तवसाळ तांबडवाडी शाळेतील उंच उडी लहान गट मुलगे मध्ये द्वितीय क्रमांक कु. हर्ष दिपक निवाते, कु. आरंभ विनोद वाघे याने ( क्रिकेट स्पर्धा ) बेस्ट फलंदाज खेळाडू म्हणून निवड, तर कु. दर्शिल अशोक निवाते लहान गट मुलगे ( खोखो ) उत्तम खेळाडू म्हणून निवड झाली. तसेच तवसाळ नं.१ शाळेची विद्यार्थीनी कु. ईश्वरी महेश सुर्वे हिने थाळी फेक या क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. Selection for sports competition of children from Tavasal
डेरवण येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. यावेळी एकुण ९ तालुक्यातील सर्व खेळाडू व मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. तर तवसाळ गावतील विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत गुहागर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या यशाचे श्रेय आपले आई-वडील, शाळेचे मुख्याध्यापक- कु.अंकुश मोहिते, कु. साईनाथ पुजार, श्री संदिप भोये सर व तवसाळ नंबर १ चे मुख्याध्यापक श्री संदीप खांडगावकर, श्री रविंद्र राठोड शा. व्य. समिती पालक वर्ग तवसाळ पंचक्रोशी वतीने समस्त ग्रामस्थ महिला मंडळ आणि सोशल मीडिया प्रसार क्रीडा प्रेमी डी जे श्री सचिन कुळये सह मुंबईकर पुणे मंडळींने पुढिल जिल्ह्यास्तरीय डेरवण इथे होणाऱ्या हिवाळी क्रिडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुलांना शुभेच्छा दिल्या. Selection for sports competition of children from Tavasal