गोविंद मोबाईल शॉपी २७ लाखाची मोबाईल चोरी प्रकरण
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील शृंगारतळी येथील गोविंदा मोबाईल शॉपीमधील २७ लाखाच्या बंपर चोरीमधील चोरटे झारखंडमधील निघाले आहेत. या चोरी प्रकरणातील एका आरोपीला काही दिवसांपूर्वी गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, भिवंडी चोरी प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीने शृंगारतळीमधील गोविंदा मोबाईल शॉपी चोरीची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनावणे करत आहेत. Second thief in the Shringaratali theft is in police custody
तालुक्यातील शृंगारतळीमधील गोविंदा मोबाईल शॉपीमधील २७ लाखाचे मोबाईल व ९० हजाराची रोकड चोरी गुहागर पोलिसांसमोर आव्हान बनले होते. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजबरोबर चिपळुण बाजारपेठेतील विविध चोऱ्या, चोरी करण्याचा केलेला प्रयत्न. एका हार्डवेअरमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये साहित्य घेतानाच फुटेज मिळून आले. त्यानंतर एसटी बस स्थानक, रेल्वेस्टेशन आदी भागातही त्यांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून अखेर आरोपी नक्की कोण याचा शोध लावण्यात त्यांना यश आले आहे. Second thief in the Shringaratali theft is in police custody
काही दिवसांपूर्वी गुहागर पोलिसांनी झारखंड येथे पोहचून त्या चोरांचे घर गाठले. मात्र या चोरीमध्ये सहभागी असल्याचा संशय धरून त्याच्या भावाला ताब्यात घेतले होते. भिवंडी येथे झालेल्या चोरी प्रकरणात भिवंडी पोलिसांनी इस्माईल नसूरुद्दीन शेख वय 28, (रा. झारखंड, राजमहल साहेब गंज) याला अटक केली होती. यावेळी त्याने शृंगारतळीतील चोरीची कबुली दिल्याने गुहागर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनावणे यांनी मंगळवारी अधिक तपासासाठी ताब्यात घेतले होते. बुधवारी गुहागर न्यायालयात हजर केले असता इस्माईल नसूरुद्दीन शेख याने या चोरीची कबुली केली आहे. त्यामुळे आता या चोरी प्रकरणातील अन्य दोन चोरट्याचा पोलीस शोध घेत आहेत. Second thief in the Shringaratali theft is in police custody