कारवाईसाठी तहसिलदारांकडे अहवाल; दंडाची कारवाई होणार का ?
गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पालशेत येथील मुख्य मार्गावरील पुलाच्या नवीन कामाला सुरूवात झाली आहे. मात्र यासाठी बनविण्यात आलेल्या पर्यायी रस्त्याच्या भरावासाठी केलेल्या उपशाची तेथील मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यामार्फत पंचनामा करण्यात आला आहे. सदर अहवाल कारवाईसाठी गुहागर तहसिलदारांकडे दाखल झाला असून आता यावर दंडात्मक कारवाई होते का याकडे लक्ष लागले आहे. Sand mining in the bay


पालशेत बाजारपेठ पुलाचा ठेका घेतलेल्या एस. एम. चिपळूणकर या ठेकेदारांनी पालशेतमधील पर्यायी रस्त्यासाठी नदीतील केलेला उपसा हा कोणती परवानगी घेऊन केला. असा सवाल केला जात आहे. सदर उपसा हा तेथील गाळ काढण्यासाठी केला असल्याचे म्हटले असले तरी ठेकेदाराच्या कामामध्ये नमूद असलेल्या पर्यायी रस्त्याच्या कामासाठी उपसा केलेली रेती वापरली आहे. तसेच पर्यायी रस्त्याच्या कामासाठी हजारो ब्रास उत्खनन करून वापरलेली रेती पुलाचे काम झाल्यावर पुन्हा नदीपात्रात टाकली जात असेल तर या उपशाचा उपयोग काय, असा सवाल केला जात आहे. Sand mining in the bay
यामुळे ठेकेदाराला सदर रेती कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढावी लागणार आहे. यामुळे झालेला उपसा हा महसुल विभागाची कोणतीही परवानगी न घेता झाला असल्याची माहीती महसुल विभागातून मिळत आहे. दैनिक सागर मधून बातमी प्रसिद्ध होताच येथील मंडळ अधिकारी कानिटकर यांनी आपण पंचनामा करून सदर अहवाल कारवाईकरीता तहसिलदारांकडे सादर केला असल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच सदर रेतीची रॉयल्टी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बिलातून वळती केली जाणार असल्याचे पत्रही आले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान शासकीय कामामध्ये कोणत्याही रेती अथवा माती वापराची रॉयल्टी आकारली जाते व ती संबधीत खात्याकडून ठेकेदाराच्या बीलातून वळती केली जाते. गुहागरमध्ये नव्याने रूजू झालेले तहसिलदार परिक्षीत पाटील यावर कोणती कारवाई करतात का याकडे लक्ष लागले आहे. Sand mining in the bay