सुमारे 14 लाखाचे नुकसान; जीवितहानी नाही
गुहागर, ता. 05 : तालुक्यातील हेदवी (हेदवतड) येथे हरिश्चंद्र गजानन पिंपरकर यांचे दुकान व पिठाची गिरण शॉर्ट सर्किटमुळे रात्री एक ते दीड च्या सुमारास आग लागली. या आगीत सर्व साहित्य जळून खाक झाले असून अंदाजे 14 लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. Shop fire in Hedvi
हेदवी( हेदवतड) येथील हरिश्चंद्र गजानन पिंपरकर राहणार हेदवी यांच्या किराणा दुकान, पिठाची चक्की व शिलाई मशीन असे एकत्र असलेल्या दुकानाला पहाटे 1.30 च्या सुमारास आग लागली. या आगीत किराणा, स्टेशनरी, कटलरी, त्याचप्रमाणेच इलेक्ट्रिक सामान, फ्रिज, डी फ्रीज, शिलाई मशीन, कपडे, तीन गिरण, लाकडी वासे, भाले, फळ्या, रिपा व कवले असेच 14 लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे. Shop fire in Hedvi