• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

“साई माऊली कलामंच” यांचा प्रयोग ३ संपन्न

by Guhagar News
January 18, 2025
in Guhagar
139 1
0
"Sai Mauli Kalamanch"
272
SHARES
778
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18  : “साई माऊली कलामंच” (मुंबई) यांचा तिसरा प्रयोग नुकताच रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी मराठी साहित्य संघ मंदिर गिरगाव, चर्नी रोड, मुंबई येथे संपन्न झाला. कोकणच्या मातीत स्थापित झालेला व नव्याने ओळख असलेल्या या कलामंचचा लोककला नमन कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “Sai Mauli Kalamanch”

"Sai Mauli Kalamanch"

या कार्यक्रमाला अधिसभा सदस्य महाराष्ट्र शासन सन्मा. किसन सावंत साहेब, उपशाखा प्रमुख – सन्मा.सचिन राऊत साहेब, युवती शाखा अधिकारी – सन्मा.अनुष्का हजारे मॅडम , सागर डावल, अनंत मोरे, संतोष कोत्रे आदि मान्यवर उपस्थित होते. उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचा सत्कार सन्मा.रमेश ठोंबरे व सन्मा.सचिन ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आला. तर प्रमुख पाहुणे सन्मा.किसन सावंत साहेब व सहकारी यांनी शंकर कळंबटे व पत्रकार नरेश मोरे यांचा शाल व श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान केला. “Sai Mauli Kalamanch”

"Sai Mauli Kalamanch"

या नमन कार्यक्रमामध्ये गणेश आराधना, गण-गवळण, राधा- कृष्ण प्रेमकहाणी व प्रेमगीत , रासलीला सादर करण्यात आली. व शेवटी लोकनाट्यातुन एकुलता एक मुलगा स्वतःच संसार स्वतः उद्ध्वस्त कसा करतो आणि अठरा विश्व दारिद्रय असलेलं गरिब आई-बाप काबाडकष्ट करून मुलाला शिक्षण देतात. त्याचा परतावा म्हातारपणी आजारात बाप मरेपर्यंत न बघता केवळ छोटा नातु आजी-आजोबांच्या बाजुने बापाची कान उघडणी करतो. हे अत्यंत सुंदर दाखवण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण नमन कार्यक्रमात रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या प्रयोगासाठी सचिन ठोंबरे – ९९२०७८२३८१, नरेश मोरे – ७०३९४९८६९९, रमेश ठोंबरे – ७३०४२३६१९६ यांच्याशी संपर्क साधावा. “Sai Mauli Kalamanch”

"Sai Mauli Kalamanch"

Tags: "Sai Mauli Kalamanch"GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share109SendTweet68
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.